Rain Damage: मेहुणबारे (ता. चाळीसगाव) १३ : परिसरात शुक्रवारी (ता. १२) अचानक आलेल्या वादळी पावसाने होत्याचे नव्हते केले. पंधराच मिनिटांच्या वादळामुळे केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या. ऐन केळीला बाजारात चांगला भाव मिळत असताना कापणीला आलेली केळी जमीनदोस्त झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. .या नुकसानाची कृषी विभागाकडून प्राथमिक पाहणी होत असली तरी शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेता शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे..Banana Crop Damage: वादळी वाऱ्याने केळी बाग उद्ध्वस्त.मेहुणबारेसह जवळच्या वरखेडे, तिरपोळे, पिंपळवाड म्हाळसा, उंबरखेड आदी परिसरात यंदा केळीची बऱ्यापैकी लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे केळीच्या झाडांचे जतन केले. मध्यंतरीच्या काळात भारनियमनासह इतर अनेक संकटे आलेली असताना शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागा वाचवल्या. ऐन केळीचे घड कापणीवर आलेले असताना शेतकऱ्यांनी दोन पैसे हाती येतील म्हणून अनेक स्वप्ने पाहिली. मात्र, कालच्या वादळाने या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केला. शेकडो एकरांवरील केळीची झाडे वादळाच्या तडाख्याने मुळासकट उन्मळून पडली.कर्ज कसे फेडावे?.Banana Crop Damage: बारामती तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागांचे नुकसान.वरखेडे भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात कालचा दिवस जणू काळा दिवस ठरला. महागडी खते, औषधे, मजुरी, ठिबक आदींवर झालेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत..आज शेतकऱ्यांच्या हातात ना पीक आहे ना पैसा. अशा परिस्थितीत बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज कसे फेडावे? घर कसे चालवावे? मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कुठून करावा? अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी सध्या विवंचनेत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.