Shirur News: शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी कडू जाणार आहे. बाजारात कांद्याचे भाव कोसळून ८ ते १० रुपये प्रति किलो इतके खाली आले आहेत. शिवाय हजारो क्विंटल कांदा विविध चाळींमध्येच सडला असून, उत्पादन खर्चही वसूल होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे..तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिल महिन्यांत कांद्याची काढणी करून तो चाळ्यांमध्ये साठवला होता. ‘आज-उद्या भाव वाढतील’ या आशेवर शेतकरी वाट पाहत होते. मात्र दिवाळीच्या तोंडावर बाजारभाव आणखी घसरले आणि जपून ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे..Onion Rate Crisis : कांदा दरासाठी विंचूरला आंदोलन.शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी कर्ज घेतले होते. त्या पैशातून औषधे, मजुरी, पाणी, वाहतूक यांचा मोठा खर्च झाला. ‘‘कांदा विकून मुलींचे शिक्षण, आरोग्यखर्च, लग्नखर्च भागवू,’’ अशी आशा होती; पण सलग दोन वर्षे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित बिघडले आहे..Onion Crisis: कमी भाव, घटलेल्या उत्पादकतेने कांदा उत्पादक संकटात.टाकळी हाजीतील कांदा उत्पादक शेतकरी देविदास पवार म्हणाले की, वर्षभर काबाडकष्ट करून पिकविलेला कांदा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी नको. मात्र, शेतमालास हक्काचा बाजारभाव हवा आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे, असे त्यांनी सांगितले..शासनाने मदतीचा हात देण्याची गरज शिरूर तालुक्यात हजारो चाळ्यांमध्ये सडलेला कांदा दिसत आहे. कांद्याचे नुकसान सरकारने तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी आणि नैराश्यग्रस्त होत असून, त्यांना उभारी देण्यासाठी शासनाने तत्काळ मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.