Pune News : कांद्याच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आणि अधिकचे दोन पैसे मिळविण्यासाठी हजारो रुपये खर्च करून उभारलेल्या कांदा चाळीही यंदा बदलत्या हवामानापुढे तग धरण्यात असमर्थ ठरत आहेत. .एकीकडे कांदा साठवण केल्यानंतर केवळ दोन ते तीन महिन्यातच कांदा खराब होऊ लागला आहे, तर दुसरीकडे पडत्या बाजारभावामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मागील वर्षी लाखमोलाचा ठरलेला चाळीतील कांदा यावर्षी मात्र मातीमोल होताना दिसत आहे..Onion Rate Crisis : केंद्राच्या धोरणाचा निषेध करत ढोल वाजवून कांद्याचे मोफत वाटप.दरम्यान, तालुक्यात सद्यपरिस्थितीत साठवणूक केलेला कांदा ६० टक्के म्हणजेच तीस ते पस्तीस हजार टन इतका शिल्लक आहे. बदलत्या वातावरणात हा कांदाही कितपत तग धरेल ही शंका असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत..कांद्याचे आगार असणाऱ्या शिरुर तालुक्यात मागील रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड झाली होती. कांदा काढणीदरम्यान कांद्याला बाजारभाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी लाकडी तसेच लोखंडी कांदा चाळी उभारल्या. .Onion Rate : खरेदी केंद्रे सुरू करा, कांद्याला भाव द्या.मागील वर्षी तालुक्यात तीन ते साडेतीन हजार एवढ्या विक्रमी कांदा चाळी नव्याने बांधल्या गेल्या. कांदा साठवणुकीसाठी पर्याय उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला. मात्र, मे महिन्यातच झालेल्या अवकाळी पावसाने वातावरणात प्रचंड बदल झाला. ऊन पावसाचा सुरू झालेला खेळ, वाढलेली उष्णता, याचा विपरीत परिणाम साठवून ठेवलेल्या कांद्यावर होत आहे..वातावरणीय बदल हे कांदा खराब होण्याचे मुख्य कारण असले तरी शेतकरी रासायनिक खतांचा कांदा पीकासाठी करत असलेला वापर, कांदा काढताना, काटताना व चाळीत भरताना काय प्रक्रिया करतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. खतांचा मर्यादित वापर, चाळ निर्जंतुकीकरण, कांदा निवडुन भरणे, गंधकचा वापर अशा बाबी केल्यास वातावरणातील बदलातही कांदा तग धरून राहतो. शेतकरी कांदा साठवायला शिकला, मात्र साठवलेला कांदा चार महीने टिकवण्याचे तंत्रज्ञानही त्याने आत्मसात करायला हवे. - जयवंत भगत, कृषी सहाय्यक..आजमितीला माझा ५०% कांदा खराब झाला आहे. गेली चार महीने बाजार जैसे थे आहे. मग कांद्याची विक्री करायची तरी कधी? मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात चाळीस ते पन्नास रुपये किलोने असणारा कांदा यावर्षी मात्र दहा ते पंधरा रुपये किलो आहे. शासनाचे निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.- योगेश भगत, कांदा उत्पादक शेतकरी, गुनाट..कांद्याचे दर कधी वाढतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. विक्रीसाठी येत असलेला बहुतांश कांदा डागाळलेला आहे. बाजारभावाची परिस्थिती पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही वसुल होणार नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक खर्चाचा व कौटुंबिक गरजांचा विचार करता कांद्याला किमान पंचवीस रुपये प्रति किलोचा भाव हवाच. कांद्याची शेती करताना शेतकरी आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी आणि मानसिकदृष्ट्या खचून जाणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी.- बबन फिरोदिया, कांदा व्यापारी, शिरुर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.