Akola News: अकोट तालुक्यासह परिसरात वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसोबतच आता मानवी जीवनावरही मोठ्या प्रमाणात हल्ले वाढत आहेत. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे, परिसरातील नागरिकांमध्ये व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. .वनविभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिला आहे..Wildlife Attack: वन्यप्राण्यांना शेत आणि घरापासून दूर ठेवण्यासाठी ५ तांत्रिक उपाय.अकोट तालुक्यातील शहापूर येथील हुसेन सुरतने यांच्यावर वन्यप्राण्याने नुकताच हल्ला केल्याची घटना घडली होती. हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या सुरतने यांच्या कुटुंबीयांची कौठकर यांनी भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत वन्य विभाग व वन कर्मचाऱ्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली..Wildlife Attack : बुलडाण्यात वन्यजीवांचा धुमाकूळ ; शेतकऱ्यांची चिंता वाढली.वन्यप्राण्यांच्या नियंत्रणाची जबाबदारी ही सर्वस्वी वनविभागाची आहे.मात्र याकडे वनविभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे आणि पाळीव प्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ दखल घेऊन ताबडतोब वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा असा इशाराही त्यांनी दिला..शिकारी प्रवृत्ती ठेवणारे हिंसक प्राणी वन्य विभाग सोडून गावकऱ्यांच्या वस्तीत येऊन शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी पळवून नेत आहेत. आदिवासी भागात नागरिकांवरही हल्ले होत आहेत. ग्रामीण भागात दहशत पसरली असताना प्रशासन आणि वन्य विभाग नरनाळा महोत्सव साजरा करीत आहे. मंगळवारपर्यंत (ता.२०) वन्य विभाग व प्रशासनाने दखल न घेतल्यास हा नरनाळा महोत्सव होऊ देणार नाही. अन्यथा तीव्र आंदोलन करू.- लक्ष्मीकांत कौठकर, विदर्भ अध्यक्ष.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.