Milk Testing: सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यव्यापी भेसळविरोधी मोहिमेचा प्रारंभ केला. सातपूर येथे त्यांनी मिठाई दुकानात अचानक तपासणी करून अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याचा संदेश दिला.