Akola News: वेटलँड इंटरनॅशनल साउथ एशिया, अकोला वन्यजीव विभाग आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने काटेपूर्णा अभयारण्यात राज्यव्यापी आशियाई पाणपक्षी गणना (Asian Waterbird Census) यशस्वीरीत्या पार पडली. .‘पाणी देणारे जंगल’ म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा अभयारण्याच्या परिसरात महान धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे. त्यामुळे हा पाणथळ प्रदेश स्थलांतरित तसेच स्थानिक पाणपक्ष्यांसाठी नंदनवन ठरत आहे. येथे येणाऱ्या पाणपक्ष्यांच्या नोंदी जागतिक पातळीवर नकाशावर याव्यात, या उद्देशाने या गणनेचे आयोजन करण्यात आले..Asian Paints Company : बैलाच्या शिंगांना देण्याच्या रंगापासून सुरुवात केलेली कंपनी.ही गणना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. एस. रेड्डी, अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी यशवंत नागुलवार तसेच आशियाई पाणपक्षी गणनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. राजू कसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली..या पाणपक्षी गणनेत एकूण ७८ पाणपक्ष्यांच्या नोंदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ई-बर्ड इंटरनॅशनल या अॅपवर नोंदविण्यात आल्या. यावर्षी काळ्या डोक्याचा सीगल, टफ्टेड बदक, काळ्या शेपटीचा गॉडविट, विस्कर्ड टर्न, ग्रेट थिक-नी आणि कॉमन पोचार्ड या पक्ष्यांची विशेष नोंद झाली. तसेच पाणकावळा, वारकरी आणि ओरिएंटल डार्टर हे पक्षी मोठ्या संख्येने आढळून आले..Asian Citrus Congress : नागपुरात ऑक्टोबरमध्ये एशियन सिट्रस काँग्रेस.काटेपूर्णा अभयारण्यात पक्षी संवर्धनासाठी कृत्रिम बेटांची निर्मिती, पक्ष्यांना आवश्यक असलेली झाडे व गवत लागवड, तसेच जुन्या झाडांचे जतन अशा विविध संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जलाशय परिसरात विविध पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. मागील गणनेत नाममात्र संख्येत आढळलेले ग्रेट थिक-नी आणि ओरिएंटल डार्टर हे पक्षी यावर्षी मोठ्या संख्येने आढळले..या पाणपक्षी गणनेत महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्यकारिणी सदस्य अमोल सावंत, अकोला जिल्हा समन्वयक डॉ. मिलिंद शिरभाते, वाशीम जिल्ह्याचे समन्वयक मिलिंद सावदेकर, सदस्य पुरूषोत्तम इंगळे, वन्यजीव छायाचित्रकार अनुल मनवर, निलेश पडघन, तसेच काटेपुर्णा अभयारण्यातील पर्यटक मार्गदर्शक नागसेन आकोडे, प्रथम सिंकटवार आणि अक्षय डाखोरे यांनी सहभाग घेतला. ही गणना यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे आणि वनरक्षक पवन कांबळे यांनी सहकार्य केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.