Ahilyanagar News: राज्यात ओला दुष्काळ लागू करा, शेतकरी शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा व नुकसानीची रास्त भरपाई सर्व नुकसानग्रस्तांना द्या, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारपासून (ता. १०) राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) व अखिल भारतीय शेतमजूर युनियन या संघटनांच्या संयुक्त ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. .किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) व अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या सभेला डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार नरसय्या आडम, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, नथू साळवे, मारोती खंदारे, उमेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा.ओल्या दुष्काळासंदर्भातील मागण्यांबाबत या तीनही संघटनांनी नुकताच मराठवाड्याचा संयुक्त दौरा केला. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांचा एक मोर्चा या प्रश्नांसाठी ३० सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला. आता या आंदोलनाचा विस्तार करत संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर १० ऑक्टोबरला मोर्चे काढून ओल्या दुष्काळा संदर्भातील प्रश्न केंद्रस्थानी आणले जाणार आहेत..Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन.शेतकऱ्यांना प्रति एकरी पन्नास हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्या, शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून तीस हजार रुपये द्या, शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा, कर्जमाफी योजनेत पीक व शेती कर्जाबरोबरच बचत गट, सावकारी व मायक्रो फायनान्स कर्जाचाही समावेश करा, विद्यार्थ्यांची फी माफ करा, पीकविम्याचे काढून टाकलेले ट्रिगर पुन्हा लागू करा, शेती, जनावरे, घरे, गोठे यांचे झालेले नुकसान सरकारी खर्चाने रोजगार हमी योजनेतून कामे काढत भरून द्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे..राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकार मात्र अशा भीषण परिस्थितीत सुद्धा केवळ मदतीच्या वल्गना करत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण श्रमिकांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष खदखदतो आहे. हा असंतोष इतरत्र वळविण्यासाठी विविध शेतकरी जातींमध्ये आपसात संघर्ष भडकवले जात आहेत. एकमेकांवर गलिच्छ पद्धतीने आरोप प्रत्यारोप करत शेती व मातीच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र केले जात आहे. १० ऑक्टोबरच्या राज्यव्यापी आंदोलनानंतरही सरकारने वरील मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे करण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे..राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना सरकार त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही असे दिसते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी किसान सभा, सीटू व शेतमजूर युनियन लढा उभारणार आहे.अजित नवले, सरचिटणीस, किसान सभा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.