Government Scheme: राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना प्राधान्य देत मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत १६० पाणंद रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. औसा विधानसभा मतदारसंघात १३९ रस्त्यांना प्राथमिकता देण्यात आली असून, रस्त्यांचे मातीकाम, दबाई काम आणि खडीकरण करण्यात येणार आहे.