Youth Training: अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान – चान्सलर्स ब्रिगेड 2025-26’ सुरू झाले आहे. राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सात दिवसीय निवासी शिबिरातून युवकांना नेतृत्व, शिस्त, धैर्य आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली जाणार आहे.