Fodder Shortage : उ. सोलापूर जिल्ह्याच्या शिवारावर दुष्काळाची गडद छाया पडली असून, खरीप पिके करपली, चारा संपला आणि विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी अक्षरशः होरपळत आहे. स्वतःचा संसार आणि दारातील जनावरे जगवायची कशी, या विवंचनेत शेतकरी दिवस कंठत असताना त्याच्या मदतीला शासन-प्रशासनाची ठोस पावले अद्याप दिसत नाहीत. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याची तसदी राजकीय नेत्यांनीही घेतलेली नाही. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाही सरकारी यंत्रणा कागदोपत्री पाहणी आणि अहवालांच्या पलीकडे सरकताना दिसत नाही. भीमा-सीना नदीकाठ व उजनी लाभक्षेत्र वगळता जिल्ह्याच्या बहुतांश भागातील पिके हातातून गेली असून, आता पशुधन आणि फळबागा वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे..गतवर्षी मे महिन्यात तुडुंब भरलेल्या विहिरींनी सध्या तळ गाठला आहे. कृषी विभागाच्या निर्देशानुसार खरीप पिकांना संरक्षित पाण्याचा पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे; मात्र विहिरीत पाणीच नाही. पुरेशी ओल नसताना केलेली पेरणी शेतकऱ्यांच्या अंगलट आली आहे. चारा पिके जळून गेल्यामुळे जनावरांच्या पोटाला काय घालावे, हा प्रश्न उभा ठाकला आहे..Kharif Distress : पिकांनी टाकल्या माना; चिंता वाढली.शेतकऱ्यांचा दिवस आभाळाकडे बघण्यात, तर रात्र येणाऱ्या दिवसाच्या चिंतेत जात आहे. असे असतानाही शासन आणि प्रशासन या दोन्ही पातळ्यांवर उदासीनता दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देताना दिसत नाहीत. आमदार सुभाष देशमुख वगळता अद्याप कुठल्या लोकप्रतिनिधीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे समोर आले नाही..२ लाख हेक्टर क्षेत्र पीकविमा संरक्षणाच्या बाहेरजिल्ह्यात एकूण ३ लाख ५७ हजार ९६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद आहे. मात्र, त्यापैकी १ लाख ५३ हजार ४२८ हेक्टर क्षेत्रावरीलच खरीप पिकांचा विमा उतरवला गेला आहे. कंपन्याधार्जिण्या विमा धोरणामुळे शेतकऱ्यांचा उडालेला विश्वास आणि त्यामुळे विमा संरक्षित क्षेत्रात झालेली घट, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याला सरकारने मदत केल्याशिवाय पर्याय नाही..Drought In Maharashtra: महिनाभर पावसाचा खंड, शेतकरी चिंतेत, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.जनावरे व बागा जगवणार कशा?जिल्ह्यात १८ लाख ६७ हजार इतके पशुधन, तर जवळपास ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. शेतकऱ्यांचे पशुधन आणि बागा दुष्काळाने उद्ध्वस्त झाल्यास त्याचे दूरगामी भीषण परिणाम होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही घटक वाचवण्यासाठी शासन आणि प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे..निर्णय घ्यावा; पिके पूर्ण करपण्याची वाट पाहू नयेजिल्ह्यात दुष्काळाची अधिकृत घोषणा होण्यासाठी सर्व निकष पूर्ण होण्याची प्रतीक्षा करताना पिकांचे प्रत्यक्ष नुकसान वाढू नये, याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, पीकविम्याच्या अग्रिम भरपाईसाठी पाठपुरावा, चारा उपलब्धतेचा तालुकानिहाय आढावा आवश्यक आहे..शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत हवीखरीप पिके हातातून गेल्यास शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार येणार आहे. पेरणीचा खर्च, बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरी यासाठी झालेला खर्च वाया जाणार आहे. उत्पन्न नसतानाही पीककर्जाची परतफेड करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसोबतच कर्ज पुनर्गठन आणि पुढील हंगामासाठी नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.