श्रीनिवास रामानुजन भारतीय गणित विश्वातील सर्वात तेजस्वी व मौलिक विचारवंत होते. पारंपरिक पद्धतीने शिकत असतानाही ते स्वतंत्र सूत्रे शोधत असत. त्यांच्या कार्याचा सन्मानार्थ २२ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय गणित दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. .श्रीनिवास रामानुजन यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि अपूर्णांक यांसारख्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. औपचारिक प्रशिक्षण नसतानाही त्यांनी ३,९०० हून अधिक सूत्रे तयार केली. ज्यात अनेक सूत्रे नवीन आणि अचूक होती. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तमिळनाडूतील कुम्भकोणम जवळच्या इरोड येथे झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची होती..Honey Bee Science: राणीमाशीची सत्ता उलथण्यामागील कारणांचा झाला उलगडा.घरात धार्मिक आणि संस्कारी वातावरण होते. लहान वयापासून रामानुजन अत्यंत शांत, एकांतप्रिय आणि विचारमग्न स्वभावाचे होते. त्यांना इतर मुलांपेक्षा आकडेमोड, कोडी, आकडेमोडनमुने यांत जास्त रस होता. शाळेत इतर विषयांत त्यांची रुची कमी होती. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच कॉलेजच्या गणिताचे प्रश्न सोडवणे सुरू केले होते. एस. एल. लोनी यांच्या ट्रिग्नोमेट्रीवरील पुस्तकातून तर जणू नवसंशोधनाचे दालन त्यांना उघडले..पारंपरिक पद्धतीने शिकत असतानाही ते स्वतंत्र सूत्रे शोधत असत. अल्पवयातच त्यांनी हजारो सूत्रांची वही तयार केली होती, जी नंतर ‘रफ नोटबुक्स’ म्हणून प्रसिद्ध झाली. रामानुजन गरीब होते. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी छोटे-मोठे नोकरीचे प्रयत्न केले. परंतु मन गणितात गुंतल्यामुळे त्यात टिकून राहणे अवघड जात होते..Science Park: पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी सायन्स पार्क.संगणकालाही आधारभूत संशोधनरामानुजन यांनी केलेले संशोधन आधुनिक गणितातील अनेक क्षेत्रांत क्रांतिकारी ठरले. जागतिक गणित विश्वाला आणि अनेक क्षेत्रातील विकासाला त्यांचे संशोधन महत्त्वाचा पाया ठरले. संख्या सिद्धांत हे रामानुजन यांचे अत्यंत आवडते क्षेत्र होते. विभाजन सिद्धांत मध्ये त्यांनी दिलेली सूत्रे आजही जगभरातील गणितज्ञ वापरतात. त्यांचे ‘पार्टिशन फंक्शन’ हे स्वतंत्र पद्धतीचे आणि अत्यंत प्रभावी आहे. रामानुजन-हार्डी संख्येमधून त्यांच्या बुद्धिमत्तेची झलक मिळते..अनंत श्रेणींच्या क्षेत्रात त्यांनी इतकी मौलिक सूत्रे मांडली की आजही त्यांचा अभ्यास नव्या पिढीला प्रेरणा देतो. पाय (π) चे मूल्य शोधण्याच्या त्यांच्या पद्धती इतक्या अचूक आणि जलद होत्या की आधुनिक संगणक तंत्रज्ञानातही त्यांचे संशोधन आधारभूत ठरले. त्यांनी गणितातील सिद्ध केलेली ही क्षेत्रे अत्यंत गुंतागुंतीची असून अत्याधुनिक गणिताचा पाया बनली. त्यांच्या मृत्यूपूर्वी सापडलेल्या ‘लास्ट नोटबुक’ मधील मॉक-थीटा फंक्शन्सवर आजही संशोधन सुरू आहे..Community Science Course : ‘कम्युनिटी सायन्स’ अभ्यासक्रमातून करिअर संधी.रामानुजन यांच्या कार्याची दखल भारतातील काही शास्त्रज्ञांनी घेतली. परंतु विस्तृत संशोधनासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नव्हते. १९१३ मध्ये त्यांनी आपली सूत्रे इंग्लंडमधील प्रख्यात गणितज्ञ जी. एच. हार्डी यांना पाठवली. हार्डी रामानुजन यांच्या प्रतिभेने थक्क झाले आणि त्यांनी रामानुजन यांना केंब्रिजला बोलावले. केंब्रिजमध्ये सन १९१४ ते १९१९ या काळात रामानुजन आणि हार्डी यांनी मिळून अनेक महत्त्वपूर्ण संशोधन लेख प्रकाशित केले. या काळात रामानुजन यांनी गणिताला जागतिक पातळीवर नवीन दिशा दिली. परंतु इंग्लंडमधील हवामान, आहार व एकटेपणा यामुळे त्यांचे आरोग्य खालावू लागले..रामानुजन यांचे कार्य साधारण लोकांना जरी अवघड वाटत आले तरी आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये त्यांचे संशोधन अप्रत्यक्षपणे उपकारक ठरले. ‘पाय’चे मूल्य शोधण्यासाठी त्यांनी विकसित केलेल्या श्रेण्या आजही संगणक अल्गोरिदममध्ये वापरण्यात येतात. मॉक-थीटा फंक्शन्स आणि मॉड्युलर फॉर्म्सचा वापर क्वांटम फिजिक्स, स्ट्रिंग थिअरी, कृष्णविवर सिद्धांत अशा आधुनिक संशोधनात होत आहे..संख्या सिद्धान्तातील त्यांचे संशोधन माहिती सुरक्षेतील कोडिंग व डिकोडिंग पद्धतींतही त्यांचे तत्त्वज्ञान दिसते. पार्टिशन थिअरीचे काही भाग सांख्यिकी, डेटा विश्लेषण आणि आर्थिक मॉडेल्समध्ये उपयोगात येतात. रामानुजन मोठ्या प्रतिभेचे, जिद्दीचे होते. आजही विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा मिळते. रामानुजन यांनी आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये निर्माण केलेल्या सूत्रांनी, अपारंपरिक परिणामांनी गणितामध्ये संपूर्ण नवीन क्षेत्रे उघडली आणि पुढील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेरणा मिळाली..रामानुजन यांचे जीवन अल्पायुषी होते. केवळ ३२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एवढ्या अल्पकाळात त्यांनी गणितविश्वाला अमूल्य असा ठेवा दिला. मर्यादित संसाधने, गरीब परिस्थिती, औपचारिक शिक्षणातील कमतरता असूनही त्यांनी केवळ आपल्या अथक परिश्रम आणि अंतर्ज्ञानाच्या बळावर जगाला नवे मार्ग दाखवले. त्यांचे योगदान कालातीत आहे. पुढील काळातील गणितज्ञांना कित्येक वर्षे पुरेल एवढी सामग्री मागे ठेवून जाणारे ते एक स्वयंभू आणि प्रज्ञावंत भारतीय गणित तज्ञ होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.