Nagpur News: कमी पर्जन्यमान, वाढती चाराटंचाई आणि दुधाळ जनावरांचे घटते पोषणमूल्य या पार्श्वभूमीवर काटेविरहित निवडुंग हा पर्यायी चारा म्हणून पुढे येत आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) पुढाकाराने काटेविरहित निवडुंगाची लागवड, चारा व्यवस्थापनात समावेश आणि त्याविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, रोपांचे निःशुल्क वितरणही केले जात आहे..कोरड्या चाऱ्यात पोषणमूल्य कमी असल्याने जनावरांच्या आरोग्यावर, तसेच दूध उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. अशा स्थितीत काटेविरहित निवडुंग हा उच्च पोषणमूल्य असलेला, कमी पाण्यात तग धरणारा आणि अल्प क्षेत्रातही मोठे उत्पादन देणारा चारा ठरत आहे. ‘माफसू’च्या शेतकरी कार्यशाळांमधून काटेविरहित निवडुंगाची लागवड तंत्रज्ञान, काढणी, प्रक्रिया आणि जनावरांना आहारात समाविष्ट करण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन केले जात आहे..Livestock Nutrition: ‘सुरभी’मुळे कोरडा चारा झाला सकस.प्रशिक्षणामुळे पशुपालकांमध्ये या पिकाविषयी जागरूकता वाढत असून, शेताच्या बांधावर, पडीक जमिनीत किंवा मुरमाड क्षेत्रात त्याची लागवड केली जात आहे. काटेविरहित निवडुंगाच्या सुधारित जाती चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. अति उष्णता, कडाक्याची थंडी आणि दुष्काळी परिस्थितीतही हे पीक सहज तग धरते. कमी पर्जन्यमान असलेल्या भागात, तसेच मुरमाड, नापीक व पडीक जमिनीतही त्याची लागवड करता येते..पानांच्या कडांवरून फुटणाऱ्या कोंबांमुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर लागवड क्षेत्र वाढविता येते. जनावरांना दिवसाला सरासरी २५ ते ३० किलो हिरवा चारा लागतो. मात्र तो रोज उपलब्ध होणे शक्य नसते. अशा वेळी सुक्या चाऱ्यात ३० टक्क्यांपर्यंत काटेविरहित निवडुंगाची पाने मिसळल्यास पोषणमूल्य वाढते. परिणामी, जनावरांचे आरोग्य सुधारते आणि दूधक्षमताही वाढते. यासाठी मोठ्या क्षेत्रावर लागवड करण्याची किंवा नियमित पाणी देण्याची गरज नसते. शेताच्या बांधावर एक-दोन झाडे लावली तरी त्यातून एक-दोन जनावरांच्या आहाराची पूर्तता करता येते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली..Livestock Nutrition: गुणवत्तापूर्ण पशुखाद्य उत्पादन प्रक्रियेतील आव्हाने.कमी पाण्यात येणारा, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि अल्प क्षेत्रात जास्त उत्पादन देणारा काटेविरहित निवडुंग हा भविष्यातील महत्त्वाचा चारा पर्याय ठरणार आहे. कोरड्या चाऱ्यात ३० टक्के निवडुंगाचा वापर केल्यास जनावरांचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादनातही वाढ होते. यासाठी ‘माफसू’च्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.- डॉ. गजानन अंभोरे, माफसू.पोषणमूल्य समृद्ध चाराकर्बोदके ६० ते ७० टक्केशुष्क पदार्थ ७ ते ११ टक्केप्रथिने ५ ते ९ टक्केतंतुमय पदार्थ ११ ते २० टक्केखनिजे १२ ते २५ टक्केस्निग्धांश २ ते ३ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.