Nashik News: कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने समाधानकारक साथ दिल्याने लाल कांद्याचे पीक जोमात आले आहे. परिणामी, संपूर्ण परिसरात सध्या लाल कांदा काढणीच्या कामाला वेग आला असून, शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. मात्र, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर काढणी सुरू झाल्याने मजुरांची तीव्र टंचाई भासू लागली असून, शेतकऱ्यांना परराज्यातील मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे..निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या चांदवड तालुक्यातील पिंपळद येथील शेतकरी शांताराम टोपे यांनी आपल्या चार एकर क्षेत्रातील लाल कांद्याची काढणी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी थेट परराज्यातून मजूर बोलावले आहेत..Onion Harvesting : कांदा पीक जोमात; महिना अखेरीस काढणी शक्य.काढणी रखडल्यास पिकाचे नुकसान होण्याची भीती असल्याने अतिरिक्त खर्च सोसूनही शेतकरी काम सुरू ठेवत असल्याचे चित्र आहे..Red Onion Rate : नगरमध्ये लाल कांद्याला विक्रमी दर, प्रति क्विंटल ४८०० रूपये भाव.सध्या शेतात दोन महत्त्वाची कामे एकाच वेळी सुरू आहेत. एकीकडे लाल कांद्याची काढणी, तर दुसरीकडे उन्हाळ कांद्याची लागवड सुरू असल्याने मजुरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्थानिक मजूर अपुरे पडत असल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे. मजुरांच्या टंचाईमुळे उत्पादन खर्च वाढत आहे..यंदा पावसामुळे कांद्याचे पीक चांगले आले, पण काढणीच्या वेळी मजुरांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकाच वेळी लाल कांदा काढणी आणि उन्हाळ कांद्याची लागवड सुरू असल्याने स्थानिक मजूर मिळत नाहीत. काढणी उशिरा झाली तर कांद्याचे नुकसान होण्याची भीती असते, म्हणून नाइलाजाने परराज्यातून मजूर बोलवावे लागत आहेत. बाजारभाव सध्या समाधानकारक असल्यामुळे वेळेत काढणी होणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे.- शांताराम टोपे, कांदा उत्पादक पिंपळद, ता. चांदवड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.