Women Economic Development Corporation : वाशिममध्ये गोडंबी व्यवसायाला गती

Shasan Aplya Dari : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मालेगाव-२ लोकसंचालित साधन केंद्रातर्फे अमानी येथील गाव विकास समितीच्या माध्यमातून गोडंबी व्यवसाय करणाऱ्या ६६ बचत गटातील महिलांना १० लाख ८० हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले.
Shasan Aplya Dari
Shasan Aplya DariAgrowon
Published on
Updated on

Washim News : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मालेगाव-२ लोकसंचालित साधन केंद्रातर्फे अमानी येथील गाव विकास समितीच्या माध्यमातून गोडंबी व्यवसाय करणाऱ्या ६६ बचत गटातील महिलांना १० लाख ८० हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले.

शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत हे कर्ज देण्यात आले. नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पातून गोडंबी ट्रेडिंग अँड मार्केटिंगचा उपप्रकल्प कार्यान्वित केला आहे. यातून अमानी येथील गोडंबी व्यवसाय करणाऱ्या महिलांना बिबे खरेदी करण्यासाठी अल्प व्याज दरातील कर्ज साहाय्य देण्यात आले.

या कर्जाचा उपयोग अमानी येथील बचतगटातील महिला बिबे खरेदी करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे गोडंबी व्यवसायाला चालना व गती प्राप्त होण्यास मदत होईल.

‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्या मार्गदर्शनात कर्जवितरण झाले. अध्यक्षस्थानी अमानी गाव विकास समितीच्या रंजना खंडारे या होत्या. सुनीता गायकवाड, व्यवस्थापक प्रा. शरद कांबळे, लेखापाल पुष्पा नलगे, राधिका भोयर, रवींद्र गायकवाड, चंद्रभागा माने व वनिता अंभोरे उपस्थित होत्या.

प्रा. कांबळे यांनी नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या गोडंबी ट्रेडिंग व मार्केटिंग उपप्रकल्पाची माहिती दिली. महिलांनी कष्टाने तयार केलेल्या गोडंबीला चांगले मार्केट मिळावे, याकरिता गोडंबीला पॅकेजिंग व लेबलिंग करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. यावेळी ६६ महिलांना १० लाख ८० हजार रुपयाचे कर्ज अल्प व्याजदरामध्ये देण्यात आले.

प्रास्ताविक लेखापाल पुष्पा नलगे यांनी केले. संचालन चंद्रभागा माने यांनी केले. वनिता अंभोरे यांनी आभार मानले.

‘कर्जाचा उपयोग उद्योग वाढीसाठी करा’

लेखापाल पुष्पा नलगे, राधिका भोयर व चंद्रभागा माने यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी महिलांना मिळालेल्या कर्जाचा उपयोग उद्योग वाढीसाठी करावा, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com