Nashik News : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त भूसंपादनासह विविध विकासकामांना गती द्यावी. सर्व कामे कालबद्ध वेळेत पूर्ण करावीत. सर्व कामे गुणवत्तापूर्ण होतील, याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिले..नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर, महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते..Nashik Kumbh Mela 2026: कुंभमेळ्याच्या तयारीबाबत रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक.श्री. महाजन म्हणाले, की आगामी सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांसंदर्भात कोणताही विलंब व्हायला नको. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. विकासकामे नियोजनबद्ध व दर्जेदार होतील याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ही कामे पूर्ण करताना त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. त्यातही रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. सिंहस्थ कुंभमेळ्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी उपक्रम राबवावेत..Simhasta kumbh Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर.डॉ. गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संनियंत्रण करावे असे सांगत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. .बैठकीत रिंग रोड भूसंपादन, त्र्यंबकेश्वर-गोदावरी पाणीपुरवठा योजना, घाटांचे बांधकाम, साधुग्राम भूसंपादन, रस्ते बांधकाम, रेल्वेस्थानक, ओझर विमानतळ विकासकामे आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापालिका आयुक्त खत्री, श्रीमती नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक श्री. पाटील, त्र्यंबकेश्वरच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के यांनी आपापल्या विभागांतर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.