Ahilyanagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी विशेष भरती प्रक्रियेचा शासन निर्णय निर्गमित झाला. त्यास गती मिळावी व भरती प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २०) सायंकाळी अंदोलन मागे घेण्यात आले..राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरतीसाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यानुसार भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसारित करण्यात आली. त्यास आठ महिने पूर्ण होत आले आहेत. अद्याप भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा झालेली नाही. .MP Nilesh Lanke : अहिल्यानगरमध्ये नोटीसशिवाय कारवाई? अतिक्रमण पाडण्यावरून खासदार लंके आक्रमक.त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ३० जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये ३१ जुलैपर्यंत वर्ग-४ (ज्या पदांना लेखी परीक्षा नाही) पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करून गुणवत्ता यादी तयार करून नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय झाला होता. तसेच उर्वरित गट ‘क’ पदांची व गट ‘ड’ मधील उर्वरित पदांची १५ ऑगस्टपर्यंत परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय झाला होता. .MP Nilesh Lanke : संरक्षण विभागाच्या परिसरातील बंद रस्ते खुले करण्याची गरज .कृषी विद्यापीठ स्तरावरून अद्याप अशा कुठल्याही प्रक्रिया केल्या गेल्या नाहीत. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी करत विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू करण्यात केले होते. .प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष विजय शेडगे, सचिव प्रमोद तोडमल यांच्यासह उपोषणकर्त्यांशी खासदार नीलेश लंके, कुलगुरू डाॅ. शरद गडाख आणि कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांनी चर्चा करून विशेष भरती प्रक्रिया राबवण्याबाबचे लेखी आश्वासन दिल्याने अंदोलन मागे घेण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.