Latur News: औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. सहा) बैठक पार पडली. बैठकीत दारुबंदी करणाऱ्या गावांना विशेष विकास निधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार यांनी जाहीर केले. .ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने सध्या राज्यभर राबविण्यात येत असलेल्या या अभियानात औसा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती सक्रियपणे सहभागी झाल्या असून, अभियानाला चालना देण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली..Drought Free Village : ग्रामस्थांच्या एकोप्यातून दूर झाला दुष्काळ .जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब वाघ, तहसीलदार घनश्याम अडसूळ, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगळे, मुख्याध्यकारी मंगेश शिंदे, सहाय्यक अभियंता रोहन जाधव, सभापती चंद्रशेखर सोनवणे, तालुका प्रशासन, अभियानात सहभागी ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..Pollution Free Village : वासुद (अकोला) गाव प्रदूषणमुक्त करण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार.यावेळी प्रत्येक गावातील सुरू असलेल्या कामांचा, उद्दिष्टपूर्तीचा तसेच येणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय बक्षिसे तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळावीत, यासाठी योग्य नियोजन, दर्जेदार कामे आणि लोकसहभाग आवश्यक आहे. या दृष्टीने जिथे सहकार्य लागेल, तेथे स्वतः उपलब्ध राहून मदत करु, अशी ग्वाही आमदार पवार यांनी ग्रामपंचायतींना दिली..ळी आमदार पवार यांनी दारूबंदी लागू करणाऱ्या गावांना विशेष विकासनिधी दिला जाईल, असे जाहीर केले.. दारूबंदीमुळे सामाजिक शांतता, आरोग्य सुधारणा आणि आर्थिक बचत शक्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे गावांनी पुढाकार घेऊन दारूबंदीचा निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीदरम्यान ग्रामपंचायतींच्या स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सेवा, पारदर्शक कारभार, महिला सक्षमीकरण व लोकसहभाग यासंबंधी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आपापली मते मांडून अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सूचना आमदार पवार यांनी दिल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.