Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या १४ गावांच्या विकासाबाबत नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी रोखठोक भूमिका स्वीकारली आहे. या गावांच्या विकासासाठी लागणारा जो भरमसाट खर्च आहे, तो महापालिकेच्या तिजोरीतून होणार नाही. गावांतील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने निधी द्यावा, अशी भूमिका पाटील यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केली. राज्य सरकारकडे निधीकरिता प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. पाटील यांच्या या भूमिकेमुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ गावांना केलेल्या विरोधाची झलक दिसून आली..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेत कल्याण तालुक्यातील समाविष्ट केलेल्या १४ गावांचा वाद अद्याप शमलेला नाही. या गावांच्या समावेशाला नाईक यांनी जाहीररीत्या विरोध केला आहे. ही गावे नवी मुंबईला जोडण्यासाठी आणि पायाभूत सुविधांकरिता तब्बल दहा हजार कोटींचा खर्च येणार असल्याचा अंदाज नाईक यांनी वर्तवला आहे. हा खर्च राज्य सरकारने करावा, नवी मुंबईकरांच्या खिशातील एकही रुपया गावांच्या विकासासाठी करू देणार नाही, अशी भूमिका नाईक यांनी वेळोवेळी स्पष्ट केली आहे..Fund Utilisation Issue: ग्रामपंचायत विभागावर विभागीय आयुक्तांची नाराजी.नाईक यांच्या या भूमिकेप्रमाणे सुजाता पाटील यांनी शुक्रवारी (ता. ६) पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांचे धोरण स्पष्ट केले. महापौरांच्या दालनात आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि विभाग प्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती..या बैठकीत भविष्यात कोणकोणत्या विकासकामांना प्राधान्य देणे आणि विभागप्रमुखांच्या उपस्थितीबाबत सुजाता पाटील यांनी प्रशासनाला सूचना केल्या. शहरातील पाणीपुरवठा, वायू प्रदूषण, पर्यावरणाची सुरक्षा, स्वच्छता हे मुद्यांना प्राधान्य देण्याबाबत सुजाता पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले..नव्याने समाविष्ट झालेल्या १४ गावांचा सर्वांगीण विकास हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. या गावांना मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि नागरी सुविधांसाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून मिळवण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार करण्याची भूमिका महापौर सुजाता पाटील यांनी प्रशासनासमोर व्यक्त केली..Agriculture Fund: शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला ३०९ कोटींचा निधी जमा.‘विभागप्रमुखांची दांडी चालणार नाही’सर्वसाधारण सभेत प्रत्येक विभागप्रमुख उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कोणताही अधिकारी सर्वसाधारण सभेत गैरहजर चालणार नाही. पहिल्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना महापौर सुजाता पाटील यांनी केल्या..समन्वयानेच समस्यांचे निराकरणपहिल्याच दिवशी आयुक्त आणि विभागप्रमुखांना बोलवण्याचे कारण म्हणजे विविध विभागांत सुरू असलेली कामे जनतेच्या हिताची कशी ठरतील, याकरिता उपाययोजना करण्याचे पहिले पाऊल असल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे समन्वय लोकांच्या समस्यांचे निराकरण करू शकते. आयुक्तांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व विभागप्रमुखांना तशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले..पर्यावरणावर लक्षनवी मुंबईचे पर्यावरण खराब होत चालले आहे. नवी मुंबईला जो वायू प्रदूषणाचा त्रास होत आहे, त्यावर तातडीने उपाय करण्याच्या सूचना केल्या आहेत. नवी मुंबई शहर हे महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे.शहराचे स्वच्छतेमध्ये असणारे अव्वल स्थान टिकून राहण्यासाठी प्रशासनाने कसे काम करावे, तसेच १४ गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.