Latur News: लातूर जिल्ह्यात मंगळवारी (ता. २८) रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. साठपैकी तब्बल ३१ मंडलांत अतिवृष्टी झाली. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंत कोसळत होता. पावसामुळे मांजरा, रेणा आणि तावरजा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. तीनही प्रकल्पांतून विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले. याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला. रेणापूर तालुक्यातील रेणा नदी काठी काढणी व मळणी करून ठेवलेले सोयाबीन पुरात वाहून गेले..जिल्ह्यात लातूर, औसा, रेणापूर आणि निलंगा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागले. यामुळे जिल्ह्यातील मांजरा, रेणा आणि तावरजा नद्या दुथडी भरून वाहिल्या. सर्वाधिक १६३ मिलिमीटर पाऊस बोरोळ (ता. देवणी) मंडलात झाला. रेणापूर तालुक्यातील पाचही मंडलांत अतिवृष्टी झाली असून रेणापूर व पोहरेगाव मंडलांत १५७ तर पानगाव मंडलात १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे..Heavy Rain Damage: अतिवृष्टीचा सव्वातीन लाख हेक्टरला फटका.यामुळे रेणा नदी दुथडी भरून वाहू लागली. रेणापूर मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग चार हजार ९८७ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. परिणामी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले. यासोबत मांजरा व निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला..तावरजा प्रकल्पातूनही विसर्ग सुरू करण्यात आला. सोयाबीनच्या झाकलेल्या गंजी पुराच्या पाण्यातून वाहत येऊन पुलाजवळ अडकून पडल्या. काही शेतकऱ्यांनी मोठा आक्रोशही केला. काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील सर्वाधिक पाऊस झाला. पुलावरून पाणी वाहत असल्याने काळेवाडी, पिंपळगाव,.Heavy Rain Damage : परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे खचल्या २१५ विहिरी .पाऊस (मिलिमीटरमध्ये)लातूर - ५६.५, औसा - २७.४, अहमदपूर - ६४.५, निलंगा - ६४.४, उदगीर - ५२.६, चाकूर - ६०.३, रेणापूर - १२६.८, देवणी - १०७.५, शिरूर अनंतपाळ - ६४.५ व जळकोट तालुक्यात ३१.१ मिलिमीटर पाऊस झाला..रेणापूर तालुक्यात मोठा पाऊस झाला असून रेणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी काढणी व मळणी करून ठेवलेले सोयाबीन पुरात वाहून गेले आहे. नुकसानीची माहिती घेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्षेत्रावर पाठविण्यात आले असून नुकसानीचा आढावा घेऊन भरपाईच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अविनाश कोरडे, उपविभागीय अधिकारी, औसा - रेणापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.