Solapur News: हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन पीक आता शेतातच अंकुरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. घटस्थापनेच्या काळातच निसर्गाने शेत-शिवारात घातलेला हा ‘घट’ शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारण ठरला आहे..बार्शीसह काही तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके मोठ्या प्रमाणावर वाया गेली. यामध्ये सोयाबीनचे नुकसान अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. उभ्या पिकातील शेंगांत पाणी साठल्याने अंकुर फुटले असून शेतातच ‘घट’ उगवल्याचे चित्र दिसून आले. हातातोंडाशी आलेले पीक आता शेतातच अंकुरून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे..Soybean Crop Damage: ऑगस्टमधील पावसाने ५५ टक्के सोयाबीन उद्ध्वस्त.काही दिवसांत सोयाबीन काढणीला येणार होते. मात्र, निसर्गाच्या प्रचंड कोपामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. वाळलेल्या शेंगांना मोड आल्यामुळे त्या उलटून बिया जमिनीत पडत आहेत. शेतात पाणी साचल्याने काढणी करणेही अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांची ‘पीक वाचावे’ ही भोळी आशा अजून शिवारात पाण्यासोबत वाहत आहे, दरम्यान, आकाश पुन्हा काळवंडून पाऊस बरसत असल्याने शेतातील पाणी कमी होण्याऐवजी वाढतच आहे..मे महिन्यापासून चांगला पाऊस होत असल्याने खरीप हंगामाची आशा शेतकऱ्यांच्या मनात बळावली होती. मात्र, सध्या उभे पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आता रब्बी हंगामावरच आहे..Flood Crop Damage : पाण्याचा लोंढा पीक नाही, जमीनच घेऊन गेला..!.अरणगाव (ता. बार्शी) येथील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पाण्यात गेले आहे. ग्रामीण भागात उभ्या पिकांचा नाश, शेतात पाणी साचलेले दृश्य आणि घटस्थापनेच्या काळातच शेतातच उगवलेला घट, हे सारे संकट शेतकऱ्यांच्या वेदनेची हकिकत सांगते. खरीप हंगामातील या संकटानंतर शेतकरी आता रब्बीच्या आशेवर जगण्याचा आधार धरून आहेत..बार्शी तालुक्यातील काढणीला आलेल्या सोयाबीन पिके पूर्णपणे पाण्यात आहेत. सोयाबीनच्या शेंगाला आता करे फुटून फार मोठे नुकसान झाले आहे.तानाजी कदम, संचालक, धान्यांकूर फार्मर प्रोड्युसर कंपनी, बार्शी.आमच्या गावात जास्त पाऊस झाल्याने डाळिंबाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.डॉ. नवनाथ मिसाळ, संचालक, अनारकिंग फार्मर प्रोड्युसर कंपनी, चिनके, ता. सांगोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.