Agriculture Challenges: अपुऱ्या पावसामुळे भिवापूर तालुक्यात खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच सोयाबी पिकावर ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव आढळून आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रोगाचा फैलाव होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे..भिवापूर तालुक्यात यंदा १७ हजार १०२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील पाच वर्षांची सरासरी १९ हजार ५५७.८० हेक्टर आहे. सध्या सोयाबीन शेंगा दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पावसाच्या खंडामुळे पिकाची वाढ खुंटली असून, चक्रीभुंगा आणि तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भावही आढळला आहे. त्यातच पांढरी माशी वाढल्याने ‘येलो मोझॅक’चा धोका निर्माण झाला आहे..Yellow Mosaic Disease: शेंगा अवस्थेतील सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव.कृषी विभागाकडून कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीचा सल्ला दिला जात असल्याचे तालुका कृषी अधिकारी सुप्रिया कोंकणी यांनी सांगितले. धानाची अवस्थाही समाधानकारक नाही..तालुक्यात धानाचे मागील पाच वर्षांचे सरासरी क्षेत्र २८२१.२० हेक्टर असून, यंदा २५०८.२० हेक्टरवर रोवणी झाली आहे. सुमारे १० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. पाण्याची सोय नसल्याने सुमारे ३५ हेक्टरवर रोवणीच झालेली नाही. रोवणी झालेल्या पिकाची वाढही पावसाअभावी अपेक्षित झालेली नाही, असेही कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..Yellow Mosaic Disease: शेंगा अवस्थेतील सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव.कापसाचे यंदाचे क्षेत्र १७ हजार ४ हेक्टर असून, पाच वर्षांची सरासरी १४ हजार ४७० हेक्टर आहे. कापूस सध्या वाढीच्या, पाती आणि काही ठिकाणी फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. पावसाअभावी वाढीवर परिणाम झाला असून मावा, तुडतुडे आणि पांढऱ्या माशीचा अल्प प्रादुर्भाव आढळला आहे. १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे..६५.६ टक्केच पाऊसभिवापूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ९४२.९ मिलिमीटर आहे. यंदा १ जून ते १६ सप्टेंबरदरम्यान महावेधनुसार ६१८.८ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ६५.६ टक्के पाऊस झाला आहे. ९ ते १६ जुलै तसेच ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान पावसाने मोठा खंड दिला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी उष्ण व दमट वातावरणामुळे रोग-किडींचा धोका कायम आहे..शेतकऱ्यांकडून फवारणीसोयाबीनवर ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव दिसताच कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कीडनाशकाची फवारणी केली. हळूहळू रोग नियंत्रणात येत आहे, असे शेतकरी मेघराज हेडाऊ यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.