राजीव घावडे, मंगेश दांडगे, डॉ. प्रवीण पाटीलSoybean Crop Protection: वेळेत पेरणी झालेली सोयाबीन पिके सध्या २५ ते ३५ दिवसांच्या अवस्थेत असतील. राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून आहे. अतिपाण्यामुळे मुळांना प्राणवायू न मिळणे, सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होणे, रसशोषक किडी व काही रोगांचा प्रादुर्भाव वाढणे अशा कारणांमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे, झाडांचा जोम कमी होणे अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. पिकामध्ये पिवळेपणा नेमका कोणत्या कारणामुळे येत आहे, हे ओळखून त्यानुसार योग्य उपाययोजना कराव्यात..सध्या काय करावे?जर पीक २०–३० दिवसांचे असून सतत पावसामुळे पिवळेपणा दिसत असेल तर घाईघाईने वारंवार फवारण्या करू नयेत. प्रथम शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. त्यानंतर २–३ दिवस उन्हाची उघडीप मिळाल्यावरच विद्राव्य खतांची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.पांढरी माशी किंवा रसशोषक किडी दिसल्यास त्यांचे त्वरित नियंत्रण करावे. कारण याच किडी पुढे पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार करतात.चुनखडीयुक्त जमिनीचा पीएच वाढल्यामुळे काही अन्नद्रव्यांचा जमिनीतून ऱ्हास होतो व पिकांना उपलब्ध होत नाहीत. चुन्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश, मँगेनीज, जस्त, तांबे, मॅग्नेशिअम आणि लोह यांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊन सोयाबीन पीक पिवळे पडू शकते.Soybean Disease Management.Soybean Disease Management : सोयाबीन रोग व्यवस्थापनात बीज प्रक्रियेचे महत्त्व.सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने गंधक जस्त आणि लोह यांची कमतरता असल्यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडताना दिसते. गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. जर गंधक कमी पडल्यास १८ टक्क्यांपर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते. गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्न निर्मितीला चांगली चालना मिळते.जमिनीचा सामू वाढला की नत्र आणि स्फुरद पिकाला उपलब्ध होत नाही. तसेच सोडिअम या घटकाचे प्रमाण वाढते. अन्नद्रव्ये सहजासहजी झाडला उपलब्ध होऊ देत नाहीत. त्यामुळे पिकाची वाढ होत नाही आणि पीक पिवळे पडते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे कमी झालेले प्रमाण व शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यांचा असलेला नगण्य वापर यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडते..पीक पिवळे पडण्याची कारणे व उपायसोयाबीन डिजिटल शेती शाळेदरम्यान सेंद्रिय शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक पिवळे पडण्याबाबत प्रश्न उपस्थित केले.सततचा पाऊस व शेतात पाणी साचल्यामुळे मुळांना प्राणवायू कमी मिळणे.जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण व सूक्ष्मजीवांची घटलेली क्रियाशीलता..नत्र, गंधक, लोह, जस्त यांसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता.चुनखडीयुक्त किंवा जास्त सामू (pH) असलेल्या जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध न होणे.पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव.पिवळा मोझॅकसारख्या विषाणूजन्य रोगांचा संसर्ग.सतत ढगाळ वातावरणामुळे प्रकाशसंश्लेषण कमी होणे..सेंद्रिय शेतीमध्ये करावयाचे उपायसेंद्रिय घटकांचा शिफारशीनुसार वापर करून जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवावी.शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत व हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवावा.५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन १००० पीपीएम ३ ते ४ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे रसशोषक किडींसाठी आलटून-पालटून फवारणी करावी.ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास व इतर जैविक घटकांचा वापर करून मुळांच्या रोगांचे व्यवस्थापन करावे..शेतात पाणी साचू न देता योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी.रोगग्रस्त व विषाणूग्रस्त झाडे त्वरित उपटून नष्ट करावीत.पिवळे चिकट सापळे लावून पांढरी माशी व इतर रसशोषक किडींचे निरीक्षण व नियंत्रण करावे.पिकाची नियमित पाहणी करून पिवळेपणाचे कारण निश्चित झाल्यानंतरच आवश्यक उपाययोजना करावी.योग्य निदानानंतर जैविक निविष्ठांचा संतुलित वापर, जमिनीचे आरोग्य सुधारणा आणि एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून पिकाचा जोम पुन्हा वाढविता येतो..Soybean Disease: सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे .उपाययोजनावरील सर्व कारणांच्या अभ्यासातून एक बाब लक्षात येते, ती म्हणजे पिकाचे आरोग्य जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असते. आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पेरणी करतानाच उपाययोजना करणे आवश्यक असते. पेरणी आटोपली असल्यास पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.शेतामध्ये ज्या भागात सोयाबीन पिवळे पडले असेल, त्या भागात कमतरतेची लक्षणे ओळखून योग्य त्या विद्राव्य खताची फवारणी घ्यावी. (प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी)नत्र अन्नद्रव्याची कमतरता : युरिया खत २० ग्रॅम.गंधक अन्नद्रव्याची कमतरता : सल्फेटयुक्त खत ५० मि.लि.लोह अन्नद्रव्याची कमतरता : सूक्ष्म अन्नद्रव्ये (ग्रेड-२) ५ मि.लि. किंवा चिलेटेड फेरस ५ ग्रॅम.जस्त अन्नद्रव्याची कमतरता : सूक्ष्म अन्नद्रव्ये (ग्रेड-२) ५ मि.लि. किंवा चिलेटेड झिंक ५ ग्रॅम.स्फुरद अन्नद्रव्याची कमतरता : १२:६१:० किंवा १७:४४:० किंवा ०:५२:३४ यापैकी एक खत ५० ग्रॅम.बोरॉन अन्नद्रव्याची कमतरता : सूक्ष्म अन्नद्रव्ये (ग्रेड-२) ५ मि.लि.१०:२६:२६ खत २० किलो अधिक ५ किलो झिंक सल्फेट किंवा ५ किलो फेरस सल्फेट द्यावे.किंवा ५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये (ग्रेड-२) अधिक त्यासोबत १५-२० किलो अमोनिअम सल्फेट द्यावे. खते देत असताना जमिनीमध्ये ओलावा असावा..तणनाशक अयोग्य वापराचा परिणामया मागील कारणे सामान्यपणे पुढील प्रमाणे...अयोग्य तणनाशक व अयोग्य प्रमाणात वापर.फवारणीसाठी कमी अधिक प्रमाणात पाण्याचा वापर.तणनाशक, खत किंवा टॉनिक एकत्रित फवारणी.तणनाशक आणि कीटकनाशक अनावश्यक एकत्र फवारणी..तणनाशकामुळे जास्त स्कॉर्चिगआले असल्यास...पिकाला कोळप्याची पाळी देणे. त्यानंतर डीएपी + युरिया खत देणे. किंवा २०:२०:००:१३ सोबत झिंक सल्फेट.फवारणी शक्य असल्यास १९:१९:१९ शंभर ग्रॅम अधिक अमिनो ॲसिड / सायटोकायनीन २५-३० मि.लि. प्रती १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.तणनाशक वापरताना कोणतेही एकच एक किंवा शिफारशीत असेल तरच २ एकत्र करून फवारणी करावी. त्यापेक्षा जास्त एकत्र करू नयेत..तणनाशक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांची एकत्र करून फवारणी करू नयेत.कोणतेही रसायन शिफारशींनुसार दिलेल्या प्रमाणात वापरावेत.तणनाशक टॉनिक किंवा खत एकत्र मिसळून फवारणी करू नयेत. ३० दिवसांपर्यंत तण नियंत्रण करण्यासाठी उपययोजना कराव्यात व शेत तण विरहित ठेवावे. विशेषतः २५-३० दिवसांनंतर तणनाशकाची फवारणी करणे शक्यतो टाळावीच..विषाणूजन्य रोगामुळे पिवळे पडलेले पीकसोयाबीनवर येणाऱ्या पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगामुळेही सोयाबीन पिवळे पडते, परंतु हा रोग सुरवातीला येत नाही. तो २५-३० दिवसांनंतर दिसून येतो. रोगग्रस्त झाडांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. शेंगाचा आकार लहान राहून यामध्ये दाणेसुद्धा कमी राहतात. हिरवे पिवळे पाने असलेले झाड दुरूनही ओळखता येते. पानांमधील हरितद्रव्य नाहीसे झाल्याने अन्न निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनात घट येते. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट संभवते. या रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोरा येण्याआधी झाला असल्यास उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट येते. एकंदर पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. परंतु ७५ दिवसानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फारसे नुकसान संभवत नाही. या रोगाचा प्रसार पांढरी माशीमुळे प्रसारित होतो, त्यासाठी पांढरी माशी व रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे..पेरणी योग्यवेळी (जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान) करणे गरजेचे असते. या वर्षी पावसामुळे अनेकांना उशीर झाला असेल, तर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.पेरणीनंतर २० व ३५ दिवसांनी निंबोळी अर्काची (५ टक्के)किंवा ॲझाडिरेक्टीन १००० पीपीएम ३ ते ४ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.सोयाबीन पिकास शिफारशीप्रमाणे संतुलित खताची मात्रा द्यावी. नत्राचा वापर अधिक असल्यास रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो..शेतामधील व बांधावरील तणांचा व पूरक वनस्पतींचा नाश करावा. कारण तणांचा नाश केल्याने विषाणू व वाहक यांच्या जीवनक्रमात अडथळा येऊन त्यांची संख्या कमी होते.प्रथमावस्थेत अत्यल्प रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून टाकावीत. कारण रोगकारक पिकांच्या आश्रयाने जिवंत राहून पुढील प्रसारास कारणीभूत ठरतात.हेक्टरी २२-२३ पिवळे चिकट सापळे लावावेत.रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता पुढीलपैकी एका आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणी प्रमाण ः प्रति लिटर पाणी.उदा. *बीटा सायफ्लुथ्रीन (८.४९ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.७ मि.लि. किंवा थायामेथोक्झाम अधिक लॅंबडा सायलोथ्रीन (संयुक्त कीडनाशक) ०.२५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलीपोल (९.३० टक्के) अधिक लॅंबडा सायलोथ्रीन (४.६० टक्के) (संयुक्त कीडनाशक) ०.४ मि.लि.- प्रा. राजीव घावडे ९४२०८४१४२१सा. प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित सोयाबीन प्रकल्प, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.