Farmer Awareness: वाशीम जिल्ह्यातील मौजे बिटोडा भोयर येथे बुधवारी (ता.२७) सोयाबीन व हळद पिकाबाबत एक दिवसीय कृषी चर्चासत्र घेण्यात आले. हे चर्चासत्र करडा (वाशीम) कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी माहिती तंत्रज्ञान व निविष्ठा पुरवठा केंद्राच्या अंतर्गत घेण्यात आले..या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ तथा रिसोड कृषी महाविद्यालयाचे तांत्रिक समन्वयक राजेश डवरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते..Agriculture Workshop: संत्रा बहर व्यवस्थापन,पीक कर्जावर आज चर्चासत्र.तसेच जैविक कीड व्यवस्थापन प्रयोगशाळेचे तांत्रिक सहाय्यक मदन सरनाईक आणि संपर्क प्रमुख एस.एम.बोदडे यांचीही उपस्थिती होती..Agriculture Workshop: मृदा आरोग्य, संतुलित खत वापरावर शेतकरी कार्यशाळा.तांत्रिक सत्रात श्री. डवरे यांनी सोयाबीन व हळद पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित लागवड पद्धती, आधुनिक वाणांची निवड, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, बीज व बेणे प्रक्रिया तसेच एकात्मिक तण, कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे जैविक निविष्ठांची बीज प्रक्रिया करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले..कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.श्री .सरनाईक व श्री. बोदडे यांनीही खरीप हंगामातील पिकांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमासाठी स्थानिक शेतकरी योगीराज मस्के, राजू पडघान, प्रभाकर भोयर यांच्यासह गावकऱ्यांनी पुढाकार घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.