Agriculture News : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा यंदाही सोयाबीनकडे अधिक कल दिसून येत आहे. दोन्ही जिल्ह्यांत गुरुवार (ता. ६)पर्यंत सोयाबीनची ५ लाख १३ हजार ९६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरम्यान, जुलैमधील पावसानंतर दोन्ही जिल्ह्यांतील खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन ते ८ लाख ११ हजार ४९४ हेक्टरवर पोहोचले आहे..अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस होत असलेल्या मंडलांतील वाढीच्या अवस्थेतील पिके बहरलेली दिसत आहेत. आंतरमशागत, खते देणे तसेच फवारणीची कामे सुरू आहेत. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे अनेक मंडलांतील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे..Kharif Sowing: सोलापूर जिल्ह्यात खरिपाची ४८ टक्के पेरणी अर्धवट ओलीवरच.कृषी विभागाच्या गुरुवार (ता. ६)पर्यंतच्या साप्ताहिक पेरणी अहवालानुसार, परभणी जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४६८ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ७९ हजार ८१३ हेक्टरवर (९२.५४ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्य पिकांमध्ये सोयाबीनची २ लाख ५६ हजार २९२ हेक्टर, तीळ ६० हेक्टर, कारळे १६.८ हेक्टर आणि सूर्यफुलाची ५२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे..कडधान्यांमध्ये तुरीची ३० हजार १८९ हेक्टर, मुगाची ४ हजार ८०९ हेक्टर, उडदाची १ हजार ९६६ हेक्टर आणि इतर कडधान्यांची १०५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तृणधान्यांमध्ये ज्वारी ३ हजार ४३५ हेक्टर, बाजरी ६७.६ हेक्टर आणि मका २९१ हेक्टरवर आहे. कपाशीची १ लाख ८४ हजार ९७९ हेक्टरवर लागवड झाली आहे..Kharif Sowing: सोलापूर जिल्ह्यात खरिपाची ४८ टक्के पेरणी अर्धवट ओलीवरच.परभणी जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण पेरणी क्षेत्र असे : परभणी ८६ हजार ३०९ हेक्टर, जिंतूर ८१ हजार ९३५, सेलू ५८ हजार ६७६, मानवत ४२ हजार ४२४, पाथरी ३४ हजार ९५, सोनपेठ ३३ हजार १३६, गंगाखेड ५३ हजार ५८०, पालम ३९ हजार ९६३ आणि पूर्णा तालुक्यात ४९ हजार ६९३ हेक्टर..हिंगोलीत ९३.७१ टक्के पेरणीहिंगोली जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार ९४९ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३ लाख ३१ हजार ६८१ हेक्टरवर (९३.७१ टक्के) पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या २ लाख ५८ हजार ६०९ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी २ लाख ५७ हजार ६७१ हेक्टरवर (९९.६४ टक्के) पेरणी झाली. भूईमूग ५ हेक्टर, तीळ ५ हेक्टर आणि कारळ्याची ४ हेक्टरवर पेरणी झाली आहे..कडधान्यांमध्ये तुरीच्या ३९ हजार ९२५ हेक्टरपैकी ३३ हजार ९८९ हेक्टरवर (८५.१३ टक्के), मुगाच्या ७ हजार १८७ हेक्टरपैकी ३ हजार २५५ हेक्टरवर (४५.२९ टक्के), तर उडदाच्या ५ हजार ५८५ हेक्टरपैकी २ हजार ३८७ हेक्टरवर (४२.७५ टक्के) पेरणी झाली आहे. इतर कडधान्यांचा पेरा १०८ हेक्टर आहे..तृणधान्यांमध्ये ज्वारीच्या ४ हजार ६११ हेक्टरपैकी ७८२ हेक्टरवर (१६.९७ टक्के), बाजरीची ३.२० हेक्टर, मक्याच्या ९४८ हेक्टरपैकी १६४ हेक्टर आणि इतर तृणधान्यांची १३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कपाशीच्या ३६ हजार ८०३ हेक्टरपैकी ३२ हजार ९२९ हेक्टरवर (८९.४७ टक्के) लागवड झाली आहे..हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण पेरणी क्षेत्र असे : हिंगोली ७१ हजार ९० हेक्टर, कळमनुरी ६३ हजार ७३६, वसमत ५८ हजार १७४, औंढा नागनाथ ५६ हजार ५५९ आणि सेनगाव तालुक्यात ८२ हजार १२२ हेक्टर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.