Ahilyanagar News : जिल्ह्यात यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीनुसार सोयाबीनची गेल्यावर्षीपेक्षा यंदा १० हजार हजार हेक्टरने कमी पेरणी झाली असून सरासरीच्या एवढी (९९.२१ टक्के) आहे. गेल्यावर्षी १ लाख ८७ हजार ०८६ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या सात वर्षाचा विचार केला तर चार वर्षापासून सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. .अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर यंदाचे सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ५७१ हेक्टर (९६.-७ टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरिपात सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, मुग, उडीद आणि अकोल तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे. मकाचे क्षेत्र तसे कमी असते. मात्र यंदा मकाची मोठी म्हणजे सरासरीच्या १३१ टक्के पेरणी झाली आहे..Kharif Sowing : सोयाबीन, सूर्यफूल क्षेत्रात घट.यंदा आतापर्यंतच्या पेरणी अहवालानुसार सोयाबीनचे क्षेत्र १० हजार हेक्टरने कमी झालेले दिसत आहे. आता सोयाबीनची नवीन पेरणी शक्य नसल्याने क्षेत्र वाढणार नाही. सोयाबीनची अहिल्यानगर तालुक्यात सरासरीच्या १०९ टक्के, पारनेर तालुक्यात १२८ टक्के, श्रीगोंदा तालुक्यात १०८ टक्के, कर्जत तालुक्यात ४३.०६ टक्के, जामखेड तालुक्यात ९७ टक्के, शेवगाव २६.०६ टक्के, पाथर्डी तालुक्यात १२० टक्के, नेवासा तालुक्यात १११.०६ टक्के, राहुरी तालुक्यात ८२.८९ टक्के, संगमनेर तालुक्यात ८४ टक्के, अकोले १०२ टक्के, कोपरगाव तालुक्यात १०७ टक्के, श्रीरामपूर तालुक्यात ७८.५१ टक्के आणि राहाता तालुक्यात १०८.२१ टक्के पेरणी झाली आहे..Marathwada Kharif Sowing : मराठवाड्यातील केवळ चार तालुक्यात अपेक्षेच्या पुढे जाऊन पेरणी .राहाता तालुक्यात सर्वाधिक २५ हजार ३६३ हेक्टर, जामखेड तालुक्यात २१ हजार ३९० तर कोपरगाव तालुक्यात २१ हजार ६९२ हेक्टरवर, अकोल्यात १९ हजार ५०० हेक्टरवर, पारनेरला १८ हजार ७००, अहिल्यानगर, संगमनेरला प्रत्येकी १७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. अन्य तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे. गतवर्षी दर मिळाला नसल्याचा यंदा परिणाम दिसत आहे. मात्र गेल्या सातवर्षाच्या तुलनेत सोयाबीन क्षेत्र वाढलेले आहे..वर्षनिहाय पेरलेले सोयाबीन क्षेत्र (हेक्टर)२०१९-२० ः ७० हजार ९५१२०२०-२१ ः ८४ हजार ५००२०२१-२२ ः ९९ हजार ३००२०२२-२३ ः १ लाख १० हजार ६२९२०२३-२४ ः १ लाख ८६ हजार २४४२०२४-२५ ः १ लाख ८७ हजार ०८६२०२५-२६ ः १ लाख ७७ हजार ९४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.