Soybean Varieties: खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची महागाई आणि काही लोकप्रिय वाणांचा तुटवडा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पावसाच्या अपेक्षेने शेतकरी पेरणीची तयारी करीत असताना बियाणे उपलब्धता, दर आणि गुणवत्तेबाबतच्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत..शेतकऱ्यांच्या मते, ज्या वाणांना अधिक मागणी असते, त्यांचा तुटवडा दरवर्षी निर्माण होतो. संबंधित कंपन्यांकडून पुरवठ्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मागणीनुसार बियाणे उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे. उगवण क्षमतेबाबत हमी नसणे आणि पसंतीच्या वाणांचा अभाव यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत..Soybean Seed Shortage: बाजारात सोयाबीन बियाण्यांची टंचाई.यंदा सोयाबीन लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी बियाण्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की कृषी विभागाकडून केवळ आवाहने आणि सूचना दिल्या जात आहेत; मात्र टंचाई, दरवाढ आणि गुणवत्तेबाबत प्रभावी उपाययोजना दिसत नाहीत..Soybean Seed Distribution: शंभर टक्के अनुदानावरील सोयाबीन बियाण्यांचे वाटप सुरू : राजकुमार मोरे.बाजारात विविध कंपन्यांच्या ३० किलो बियाण्यांच्या पिशव्यांचे दर ४,२०० ते ४,६०० रुपयांदरम्यान आहेत. कमी पाण्यात तग धरणारे, लवकर येणारे किंवा विशिष्ट जमिनीसाठी योग्य वाण असल्याचे सांगून विक्री केली जात आहे. काही कृषी केंद्रांमधून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचाही आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.उगवण कमी झाल्यास किंवा इतर समस्या निर्माण झाल्यास जबाबदारी निश्चित करण्याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी अधिकच अस्वस्थ आहेत. काही लोकप्रिय वाणांच्या शोधात शेतकऱ्यांना कृषी केंद्रांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत..सोयाबीन क्षेत्र वाढण्याचा अंदाजमहाबीजचे सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध झाले असून त्यालाही चांगली मागणी आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे उगवण क्षमतेबाबत तक्रारी उद्भवू नयेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. खानदेशात यंदा सोयाबीन लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २६ ते २८ हजार हेक्टरवर तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मिळून १२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.