Poor Quality of Seeds: एल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पेरण्या खोळंबल्या असतानाच पेरणी केलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. सरकारी मालकीच्या महाबीजसह १३ कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या आहेत. .आतापर्यंत लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत बियाण्यांची उगवण न झाल्याच्या ४६८ तक्रारी, तर एकट्या लातूर जिल्ह्यात १७१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी विभागात सर्वाधिक २६२, तर लातूर जिल्ह्यात १०४ तक्रारी महाबीजच्या बियाण्यांबाबत आहेत. यंदा पावसाने सुरुवातीला हजेरी लावली, त्यानंतर खंड पडल्याने पेरण्या टप्प्याटप्प्याने झाल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या..Soybean Seeds Complaints: सोयाबीन बियाण्यांविरोधात तक्रारींचा पाऊस.मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांसह न उगवलेल्या बियाण्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लातूर विभागात आतापर्यंत केवळ ६१ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून लातूर जिल्ह्यात ४३ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समित्यांकडून पंचनामे सुरू झाले असून दिवसागणिक तक्रारींची संख्या वाढत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांच्या निकृष्ट उगवणीमुळे दुबार संकटाचा सामना करावा लागत आहे..५० टक्क्यांहून अधिक तक्रारी आल्यासच मदतमहाबीजचे लातूर जिल्हा व्यवस्थापक आर. एम. माने यांनी सांगितले की, जिल्ह्यात महाबीजने ३५ हजार क्विंटल प्रमाणित सोयाबीन बियाण्यांची विक्री केली आहे. सर्व बियाण्यांची शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणी आणि एफईटी चाचणी झाल्यानंतरच विक्री करण्यात आली. आतापर्यंत ७९ शेतकऱ्यांच्या सुमारे ५० क्विंटल बियाण्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांची लॉटनिहाय पडताळणी सुरू आहे. एखाद्या लॉटमधील ५० टक्क्यांहून अधिक बियाण्यांबाबत तक्रारी आढळल्यासच शासनाच्या निकषांनुसार मदतीचा प्रस्ताव पाठविला जाईल..SAATHI Portal: निकृष्ट बियाण्यांवर ‘साथी’ पोर्टलने बसला असता लगाम?.शास्त्रीय पद्धतीने तपासणीलातूर जिल्ह्यात अहमदपूर, जळकोट, देवणी आणि लातूर तालुक्यांत पंचनामे सुरू असून दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सर्व तक्रारींची शास्त्रीय पद्धतीने तपासणी सुरू केली आहे. काही ठिकाणी कंपनीच्या बियाण्यांच्या शेजारी पेरलेले घरगुती बियाणे चांगले उगवले असल्याचे पाहणीत दिसून आले असून काही कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये उगवणक्षमतेचा अभाव असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळल्याची माहिती कृषी संचालक महेश तीर्थकर यांनी दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनीही सर्व तक्रारींची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी सुरू असल्याचे सांगितले..महाबीजच्या तक्रारी सर्वाधिकबियाणे न उगवल्याच्या नांदेड जिल्ह्यात १९४, लातूरमध्ये १७१, धाराशिवमध्ये ४९, परभणीमध्ये ४१ आणि हिंगोलीमध्ये १३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महाबीजच्या बियाण्यांबाबत लातूरमध्ये १०४, नांदेडमध्ये ९४, धाराशिवमध्ये ३३ आणि परभणीमध्ये ३१ तक्रारी आहेत. खासगी कंपन्यांनी काही ठिकाणी शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिले असले, तरी महाबीजकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लातूर जिल्ह्यात ऋषिकेश (३१), ओसवाल (२२), चेतक (७), तसेच बुस्टर, ओडीएसएफ, अंकूर, धनलक्ष्मी, कृषिधन, ग्रीन लिमका, इगल, सनअॅग्री आणि प्यारी या कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांबाबतही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत..३२ शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिलेचाकूर तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यानंतर अहमदपूर (४३), उदगीर व जळकोट (प्रत्येकी २३), औसा (१०), लातूर व रेणापूर (प्रत्येकी ७), निलंगा (५), देवणी (२) आणि शिरूर अनंतपाळ (१) तालुक्यांचा क्रमांक लागतो. आतापर्यंत १७१ तक्रारींपैकी ८३ तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले असून ५५ तक्रारींचे पंचनामे प्रलंबित आहेत. तक्रारीनंतर ३२ शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांनी बियाणे बदलून दिले असून एका शेतकऱ्याने तक्रार मागे घेतल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.