Pune News : देशात यंदा सोयाबीनची लागवड घटली आणि त्यात पावसाने दणका दिला. त्यामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन १७ टक्क्यांनी कमी होऊन १०५ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) व्यक्त केला आहे. मात्र व्यापारी संस्था आणि जाणकारांच्या मते यंदा सोयाबीन उत्पादन केवळ ९५ ते ९९ लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे..‘सोपा’ने नुकताच नव्या हंगामातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. यंदा ११४ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. गेल्या वर्षी ११८ लाख हेक्टरवर लागवड होती. यंदा क्षेत्र घटण्याबरोबरच हेक्टरी उत्पादकताही कमी झाल्याचे सोपाचे म्हणणे आहे. सोयाबीनची उत्पादकता यंदा प्रति हेक्टर ९२० किलो म्हणजेच ९ क्विंटल २० किलो राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील उत्पादन यंदा १०५ लाख टनांवरच स्थिरावेल. मागील हंगामात हेक्टरी उत्पादकता १० क्विंटल ६३ किलो होती. त्यामुळे उत्पादन जवळपास १२६ लाख टनांवर पोचले होते..Soybean Market: अहिल्यानगरला सोयाबीनला साडेतीन ते चार हजारांचा दर.राजस्थानमध्ये निम्मी घटयंदा पाऊस आणि कीड-रोगामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. त्यातही राजस्थानमधील उत्पादन निम्म्याने घटल्याचे सोपाने म्हटले आहे. तसेच अनेक भागांत येलो मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच पावसाने मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे..महाराष्ट्रातही दणकामहाराष्ट्रातही पावसामुळे सोयाबीन पिकाचे जबर नुकसान झाले आहे. राज्यातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्टा असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत सोयाबीनचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. अर्थात, सोपाच्या अहवालामध्ये याची सविस्तर माहिती दिलेली नाही. महाराष्ट्रातील नुकसानीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर देशातील एकूण सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात आणखी घट होण्याची शक्यता आहे..Soybean Crop Damage : सिन्नर तालुक्यात सोयाबीनला सर्वाधिक फटका.मध्य प्रदेशात भावांतर योजनामध्य प्रदेश सरकारने यंदा सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू केली आहे. त्यानुसार सरकार बाजारभाव आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. .शेतकरी गरज असेल तेव्हा सोयाबीन विकू शकतात. पण त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव वाढू शकतो. केवळ एकाच राज्यात ही योजना राबविल्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान व इतर राज्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.उत्पादन १०० लाख टनांपेक्षा कमीचदेशातील सोयाबीन उत्पादन यंदा १०५ लाख टनांपर्यंत कमी झाल्याचे सोपाचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात व्यापारी संस्था आणि जाणकारांच्या मते, उत्पादन ९५ लाख ते ९९ लाख टनांच्या दरम्यानच स्थिरावेल. सोयाबीन उत्पादक राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.