Pune News: आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयातेलाचे भाव पामतेलापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सोयातेलाची आयात नोव्हेंबरमध्ये १८ टक्क्यांनी कमी झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत सोयातेलाची आयात कमीच राहण्याची शक्यता आहे. याचा आधार देशातील सोयाबीन बाजारालाही मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .भारत खाद्यतेल आयातीत जगात आघाडीवर आहे. भारताच्या आयातीत प्रामुख्याने पामतेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेलांचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे भाव सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा कमी आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात पामतेलाची आयात ५ टक्क्यांनी वाढली आहे..Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर वाढले.भारताने ६ लाख ३२ हजार टन पामतेलाची आयात केली, असे द सॉल्वेंट एक्स्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘एसईए’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. याचा फायदा निर्यातदार मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांना होत आहे. बुर्सा मलेशिया एक्स्चेंजवरही पामतेलाच्या दराला आधार मिळत आहे..नोव्हेंबर महिन्यात भारताची सोयातेलाची आयात १८ टक्क्यांनी घटली आहे. सोयातेलाची आयात ३ लाख ७० हजार टन झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ४ लाख १४ हजार टन आयात झाली होती..Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ.सूर्यफूल तेलाचीही आयात तब्बल ४५ टक्क्यांनी घटली आहे. तर १ लाख ४२ हजार सूर्यफूल तेल देशात आले होते. संयुक्त अरब अमिरातीमधून ५ हजार टन कॅनोला तेलाची आयात झाली आहे. सोयातेल आणि सूर्यफूल तेलाची आयात कमी झाल्याने एकूण खाद्यतेलाची आयात गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोचली आहे. तर ऑक्टोबरच्या तुलनेत १३.३ टक्क्यांनी आयात कमी झाली..चीनमधूनही आयातगेल्या काही महिन्यांपासून चीनमधूनही सोयातेलाची आयात होत आहे. चीनमध्ये गाळप वाढून सोयातेलाचा साठा तयार झाला होता. त्यामुळे चीनमध्ये सोयातेलाचे भाव कमी झाले. अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या तुलनेत भाव कमी असल्याने चीनमधून भारतात सोयातेलाची आयात वाढत आहे. नोव्हेंबरमध्ये ७० हजार टन आयात झाल्याचे ‘एसईए’ने म्हटले आहे..पामतेल स्वस्तसध्या जागतिक बाजारात पामतेल सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा स्वस्त आहे. पामतेल सूर्यफूल तेलापेक्षा टनामागे २०० डॉलर स्वस्त असून सोयातेलापेक्षा १०० डॉलरने स्वस्त आहे. कच्च्या पामतेलाचे भाव १०७५ डॉलर प्रतिटन, सोयातेल ११७५ डॉलर आणि सूर्यफूल तेल १३०० डॉलर प्रतिटनांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे भारतातील आयातदार डिसेंबर आणि जानेवारीच्या शिपमेंटसाठी सौदे करत आहेत..सोयातेलाचे भाव सध्या जास्त आहेत, त्यामुळे आयात कमी झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत सोयातेलाची आयात कमीच राहण्याची शक्यता आहे. अर्जेंटिना आणि ब्राझीलचे सोयाबीन बाजारात आल्यानंतर मार्चपासून आयात वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सोयातेलाच्या कमी आयातीचा सोयाबीनला आधार राहील. राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार विश्लेषक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.