Rabi Farming Preparation: टाकरखेडासंभू, जि. अमरावती : पावसाचा प्रदीर्घ खंड आणि जमिनीतील घटता ओलावा यामुळे सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवून रब्बी हंगामासाठी जमीन तयार करण्यास सुरुवात केली आहे..भातकुली तालुक्यात यंदा सोयाबीनची २२ हजार २०७ हेक्टरवर, कापसाची १९ हजार १२८ हेक्टरवर, तर तुरीची ९ हजार ३६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याशिवाय उडदाचे ७५, इतर तेलबियांचे १०, मक्याचे ७.२० आणि मुगाचे २.४० हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यातील प्रमुख खरीप पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसला असून, हलक्या व मध्यम जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे..Soybean Crop Loss: सोयाबीनमधून यंदा खर्च निघण्याचीही शक्यता धूसर.सोयाबीनमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापणी व मळणीचा खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः खारपाणपट्ट्यातील मोठ्या प्रमाणावरील कोरडवाहू शेतीला पावसाच्या खंडाचा अधिक फटका बसत आहे..Soybean Crop Crisis: पश्चिम विदर्भातील ९ लाख हेक्टरवरील सोयाबीन संकटात.दरम्यान, शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करून जमिनीतील ओलावा, पिकांची अवस्था आणि उपलब्ध साधनांचा विचार करून पुढील पीक व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले आणि मंडळ कृषी अधिकारी अमोल सराड यांनी सांगितले. तांत्रिक मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व सहायक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही या अधिकाऱ्यांनी केले..दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भातकुली तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत शेतकऱ्यांच्या तक्रारी व अडचणींचे निराकरण केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.