Wardha News : संततधार पाऊस तसेच त्यानंतर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सेलू तालुक्यात सोयाबीनवर विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे उत्पादकता प्रभावित होणार असल्याने त्याची दखल घेत सर्व्हेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. .जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यानुसार, वर्धासह विदर्भातील बहुतांश जिल्हयात गेल्या आठवड्यात पावसाची संततधार होती. पावसाने उघडीप दिल्यानंतरच्या काळात ढगाळ वातावरण कायम आहे. ही स्थिती किडरोगाला पोषक ठरते. .Soybean Karpa Disease: सोयाबीनवरील (अँथ्रॅकनोज) करपा रोगाचे व्यवस्थापन.सेलू तालुक्यात देखील सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर किडरोग वाढीस लागले आहे. त्याचा परिणाम उत्पादकतेवर होणार आहे. किडरोग असलेल्या भागात निम्म्यापेक्षा अधिक उत्पादकता घटणार असल्याचे सांगितले जाते. .त्यासोबतच सेलू तालुक्यातील काही शिवारात पाणी साचल्याने त्यासोबतच पावसाच्या संततधारेमुळे संपूर्ण पीक जळाल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याची अस्वस्थता लक्षात घेता त्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त भागात सर्व्हेक्षण व पंचनाम्याची कारवाई करावी, अशी मागणी आहे..Soybean Disease: सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव.या प्रक्रियेनंतर भरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची देखील कारवाई विनाविलंब व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते शेखर शेंडे यांच्या नेतृत्वातील राजेंद्र मिश्रा, रवींद्र वैरागड, काशिनाथ लोणकर यांच्या शिष्टमंडळाने केली..बाजारात दर कमीनैसर्गिक आपत्तीसोबतच बाजारात सोयाबीनचे दर कमी असल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यंदा ५३२८ रुपयांचा हमीभाव सोयाबीनला जाहीर केला आहे. परंतु सद्या सोयाबीनचे व्यवहार ४२०० रुपयांनीच होत असल्याचे चित्र आहे. शासनाने हमीभावाबाबत देखील ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.