Satara News : जिल्ह्यात प्रत्येक खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकाची लागवड झाली आहे. या हंगामात ८२ हजार १९९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. दर कमी असलेतरी खरिपात पर्यायी पीक नसल्याने या हंगामातही सोयाबीन लागवड सर्वाधिक केली असल्याचे आकडेवारी स्पष्ट होत आहे. .कृषी विभागाकडून सोयाबीन लागवडीसाठी सर्वसाधारण ९२ हजार ८७५ हेक्टर क्षेत्र नियोजित करण्यात आले होते. खरिपात झालेल्या पेरणीत सोयाबीनची ८२ हजार १९९ हेक्टर म्हणजेच ८९ टक्के क्षेत्रावर लागवड झाली असल्याची नोंद झाली आहे. पेरण्याचा हंगाम संपला आहे. महाबळेश्वर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात सोयाबीनची लागवड झाली आहे..Soybean Sowing Khandesh : सोयाबीनला हवा पाऊस; फुलधारणा जोमात.हंगामाच्या सुरवातीस पाऊस झाल्याने पेरण्याची कामे उशिरा सुरू झाली असलीतरी सरासरी क्षेत्राऐवढी पेरणीची कामे उरकली आहेत. सध्या पिकांच्या अवस्था चांगली असून आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. दसरा, दिवाळी या प्रमुख सणाच्या तोंडावर हे पीक पैसा उपलब्ध करून देणारे असल्याने खरीप हंगामात टप्प्याटप्प्याने या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. .मात्र मागील चार ते पाच वर्षांत सोयाबीनच्या दराला ग्रहण लागल्याने हे पीक शेतकऱ्यांना परवडेना असेल झाले आहे. सध्या मिळत असलेला दर सोयबीन न पवडणारा आहे. केंद्र सरकारने किमान आधारभूत किमतीत केलेली वाढ तुटंपुजी असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. बियाण्याचा वाढलेला दर, खते, मशागती तसेच नैसर्गिक आपत्तीतून होत असलेले नुकसान व सोयाबीनला मिळत असलेला दर ही गणिते जुळत नाही. .Soybean Sowing : अहिल्यानगरला सोयाबीन क्षेत्र दहा हजार हेक्टरने घटले.दर वाढतील या एकमेव आशेवर अनेक शेतकऱ्यांकडून वर्षभर सोयाबीन गोडाऊन मध्ये ठेवले होते. मात्र दर न वाढल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करण्याची वेळ आली होती. सोयाबीन ठेवण्याची व्यवस्था नसलेले शेतकरी सोयाबीनची शेतात थेट विक्री करत असल्याने शेतकऱ्यांकडून यांचा फायदा घेऊन कमी देण्याचे प्रकार घडतात..तालुकानिहाय सोयाबीन क्षेत्र (हेक्टरमध्ये)सातारा ः १६६३१, जावळी ः ३७४०, पाटण ः ७३०१, कऱ्हाड ः १६१७४, कोरेगाव ः १२४२६, खटाव ः १११४६, माण ः २७०, फलटण ः ८५८, खंडाळा ः ७०७५, वाई ः ६५७८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.