Kharif Soybean Acreage Forecast: ‘एल निनो’मुळे कमी पावसाचा अंदाज आणि वाढलेल्या दरामुळे यंदा देशात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यंदा शेतकरी ऊस व मका यांसारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी सोयाबीन लागवडीला प्राधान्य देतील, अशी शक्यता शेतकरी व सोयाबीन उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली..देशातील खरीप हंगामात सोयाबीनला जास्त पसंती मिळू शकते, याविषयीचे वृत्त ‘राॅयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मक्याला प्राधान्य दिले होते. मात्र यंदा परिस्थिती बदलली असून, मक्याच्या तुलनेत अधिक भाव मिळत असल्याने सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता आहे..Soybean Sowing Tips: पेरणीपासूनच रोगमुक्त सोयाबीनसाठी प्रयत्न आवश्यक.गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने शेतकरी पुन्हा सोयाबीन लागवडीकडे वळण्याची शक्यता आहे, असे सोयापेंड उत्पादक व निर्यातदार तसेच महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॅक्शन्सचे व्यवस्थापकीय संचालक मनोज अग्रवाल यांनी सांगितले. देशात २०२५ मध्ये सुमारे १२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड झाली होती. यंदा अनुकूल परिस्थितीमुळे सोयाबीन लागवड क्षेत्रात सुमारे १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज उद्योगाने व्यक्त केला आहे..मे महिन्यात सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ७५८७ रुपयांपर्यंत पोहोचला होता. हा दर गेल्या चार वर्षांतील उच्चांकी ठरला. सोयाबीनचा हमीभाव ५३२८ रुपये प्रति क्विंटल असल्याने पेरणीच्या तोंडावर झालेल्या दरवाढीचा परिणाम शेतकऱ्यांच्या पीक निवडीवर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मक्याचा हमीभाव २४०० रुपये प्रति क्विंटल असला, तरी बाजारात त्याला २००० रुपयांपेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे यंदा अनेक शेतकरी मक्याऐवजी सोयाबीन लागवडीकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..Soybean Seed Distribution: अनुदानावरील सोयाबीन बियाण्याचे वितरण सुरू.खरीप २०२५ हंगामातील सोयाबीन उत्पादन घटल्यामुळे भारताची सोयाबीन आयात यंदा विक्रमी ९ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयातेलाच्या आयातीत वाढ होत आहे. मात्र, सोयाबीन उत्पादन वाढल्यास आयातीवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे मुंबईस्थित जागतिक व्यापार संस्थेतील एका व्यापाऱ्याने सांगितले. भारत मुख्यतः इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेल आयात करतो, तर सोयातेल आणि सूर्यफूल तेलाची आयात प्रामुख्याने अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून केली जाते..ऊस उत्पादकांचीही सोयाबीनला पसंती?देशात यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने ऊस पिकाला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. सोयाबीनला उसाच्या तुलनेत कमी पाणी लागते. त्यामुळे अनेक भागांतील ऊस उत्पादक शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळण्याचा विचार करत असल्याचे ‘रॉयटर्स’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.