Rabi Season Marathwada : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण ७ लाख २७ हजार ५१४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७ लाख ८१ हजार ६२ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक १२५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख ३८ हजार ८२१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख २९ हजार १७३ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात साधारण २ लाख ११ हजार ८१९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ४ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख ७६ हजार ९३३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३ लाख ४६ हजार ९४३ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली, जी सर्वाधिक आहे..Rabi Sowing: लातूर विभागात रब्बी पेरा शंभर टक्क्यांवर.२.७१ लाख हेक्टरवर हरभरातीनही जिल्ह्यांत सर्वसाधारण २ लाख ३३ हजार ५९६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ७१ हजार ७३२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११६.३३ टक्के आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५९ हजार २९१ हेक्टर, जालन्यातील ७८,५३९ हेक्टर तर बीडमधील १ लाख ३३ हजार ९०२ हेक्टर क्षेत्रावरील हरभऱ्याचा समावेश आहे..७७४७३ हेक्टरवर मकातीनही जिल्ह्यात मकाच्या सर्वसाधारण ५३ हजार १७२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७७४७३ हेक्टर वर मकाची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १४५.७० टक्के आहे. मकाची पेरणी झालेल्या या क्षेत्राच्या तुलनेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ५४०४२ हेक्टर, जालन्यातील १९३९९ हेक्टर बीडमधील ४०३२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे..Rabi Sowing: शिराळा तालुक्यात रब्बीच्या ९० टक्के पेरण्या.२.३० लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीतीनही जिल्ह्यांत सर्वसाधारण २ लाख ७४ हजार ४६५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ३० हजार ९९४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८०.५२ टक्के आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २४,१२९ हेक्टर क्षेत्रासह जालन्यातील ६३,२८४ तर बीडमधील १ लाख ३३ हजार ५८१ क्षेत्राचा समावेश आहे..अशी आहे पीक स्थितीज्वारी, मका वाढीच्या अवस्थेतहरभरा घाटे लागण्याच्या अवस्थेतगहू उगवणी, वाढ व ओंब्या लागण्याच्या अवस्थेत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.