Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र ३० हजार ११४ हेक्टरने घटले आहे. गतवर्षी या तीन जिल्ह्यांत रब्बी ज्वारीची पेरणी २ लाख ९९ हजार ५०७ हेक्टरवर झाली होती, ती यंदा २ लाख ६९ हजार ३९२ हेक्टरपर्यंत मर्यादित राहिली आहे..यंदा रब्बी ज्वारीची पेरणी झालेल्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण ४४ हजार १९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष पेरणी २६ हजार ८५६ हेक्टरवर झाली आहे. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख २ हजार १५७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६८ हजार ८० हेक्टरवर पेरणी झाली, तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख २८ हजार १०८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक १ लाख ७४ हजार ४५६ हेक्टरवर रब्बी ज्वारीचे क्षेत्र आहे..Rabi Sowing Area: रब्बी पेरणी क्षेत्र ८ लाख हेक्टरने आघाडीवर.गतवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण ४६ हजार ३७७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३२ हजार ८०८ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती. जालना जिल्ह्यात ८६ हजार ९३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८६ हजार ११९ हेक्टरवर, तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ६८ हजार ८२२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ८० हजार ५८० हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटत असल्याचे चित्र आहे..Rabi Crop Area: रब्बी पीक क्षेत्रात १८.२४ लाख हेक्टरनं वाढ, कडधान्यांत हरभरा सर्वाधिक.गतवर्षीच्या रब्बी हंगामात तीनही जिल्ह्यांत मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार २४७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८९ हजार २५२ हेक्टरवर लागवड झाली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण १८ हजार ९८६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५५ हजार ९९ हेक्टरवर मका लागवड झाली होती. जालना जिल्ह्यात १३ हजार २६६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २९ हजार ५३५ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात ५ हजार ९५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४ हजार ६१८ हेक्टरवर मका लागवड झाली होती..यंदा मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ५३ हजार १७२ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ३७३ हेक्टरवर लागवड झाली आहे. हे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ३० हजार १२१ हेक्टरने अधिक आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६९ हजार ९२१ हेक्टर, जालना जिल्ह्यात ४३ हजार ५७१ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात ५ हजार ८८१ हेक्टर मका क्षेत्राचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.