Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत ५ लाख ६४ हजार ९१० हेक्टर पेरणी झाली आहे.कृषी विभागाच्या माहितीनुसार, पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वसाधारण २ लाख ३८ हजार ८२१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ५७.१६ टक्के म्हणजे १ लाख ३६ हजार ५१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख ११ हजार ८१९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ८०.१६ टक्के म्हणजे १ लाख ६९ हजार ७९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.बीड जिल्ह्यात सर्व साधारण २ लाख ७६ हजर ९३३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ९३.३८ टक्के म्हणजे २ लाख ५८ हजार ५९७ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राचा विचार करता बीड जिल्हा तीनही जिल्हा रब्बी पेरणीत आघाडीवर असून त्या पाठोपाठ जालना व सर्वात कमी पेरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झाली आहे..Rabi Sowing: सातारा जिल्ह्यात रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात.करडईची पेरणी नगण्यमराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यात करडईचे सर्वसाधारण क्षेत्र २०२२ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ २०७ हेक्टर वरच करडईची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये बीड मधील १७२ हेक्टर जालन्यातील २३ तर छत्रपती संभाजीनगर मधील केवळ १२ आहेत ट्रस्ट क्षेत्राचा समावेशआहे..Rabi Sowing: चंद्रपुरात रब्बी लागवड क्षेत्र पोहोचले ५३ हजार हेक्टरवर.एक लाख हेक्टरवर ज्वारीछत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख ७४ हजार ४६५ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात एक लाख ८६ हजार ३० हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६७.७८ टक्के इतकी आहे. पेरणी झालेल्या रब्बी ज्वारी क्षेत्रामध्ये बीड मधील १ लाख ९ हजार ७४५ हेक्टर या सर्वाधिक क्षेत्रासह, जालन्यातील ५६ हजार ७६१ हेक्टर तर छत्रपती संभाजीनगरमधील १९ हजार ५२४ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..४५ हजार हेक्टरवर मकाजालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीनही हंगामात मका पेरणी केली जाते. यंदाच्या रब्बी हंगामात तीनही जिल्ह्यात मक्याच्या सर्वसाधारण ५३ हजार १७२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४५ हजार ७६४ हेक्टर वर मक्याची लागवड झाली आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील १७८८ हेक्टर क्षेत्रासह जालन्यातील १३ हजार ६०३ व छत्रपती संभाजीनगरमधील ३० हजार ३७३ क्षेत्राचा समावेश आहे..दोन लाख हेक्टरवर हरभरातीनही जिल्ह्यात हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३३ हजार ५९६ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २ लाख १ हजार ६३ हेक्टर वर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये बीड मधील ९९ हजार ४५६, जालन्यातील ६३ हजार १०४ तर छत्रपती संभाजीनगरमधील ३८ हजार ५०३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.