Summer Fodder Management: खानदेशात संकरित आणि दादर ज्वारीचा कडबा यंदा मुबलक आहे. दादर ज्वारी कापणी, मळणीस पूर्ण झाली असून, कडबा, कुट्टीची साठवणूक सुरू आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी कोरडा चारा साठविण्याचे काम शेतकरी पूर्ण करून घेताना दिसत आहेत. .मागील हंगामात दादर ज्वारीच्या कडब्याचे दर साडेचार ते चार हजार रुपये प्रतिशेकडा असे होते. यंदा हे दर स्थिर आहेत. ज्वारीची मळणी, काढणी मागील महिन्यातच झाली आहे. कोरडवाहू दादर ज्वारीच्या कडब्याचे दर अधिकचे असतात. हा कडबा यंदा बऱ्यापैकी आहे. तो फक्त तापी, अनेर नदीच्या क्षेत्रात उपलब्ध आहे..Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसाचा फटका; कडबा महागला.कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी दिवाळीच्या काळात काळ्या कसदार जमिनीत जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागात झाली होती. या क्षेत्रात पीक मळणी सुरू आहे. काही भागात पीक उशिराने मळणीवर आले आहे. मागील वर्षी दादर ज्वारीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत होते. यंदा दर काही भागात स्थिर आहेत..Dadar Jowar: दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात.यंदा खरिपात कमी चारा ओल्या दुष्काळी स्थितीमुळे उपलब्ध झाला. यामुळे चाराटंचाई काही भागात आहे. पण आता चारा मुबलक आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांची कापणी, मळणी झाली आहे. दुधाळ पशुधनाला कोरडा चारा मिळू लागला आहे. साठविलेला चारा संपत आला होता. रब्बीतील कोरडा चारा उपलब्ध होत असल्याने त्याची साठवणूक सुरू झाली आहे. माळरानात आता हिरवा चारा नाही..शिवारात कुट्टी करून साठवणुकीस गतीखानदेशात बाजार समित्या किंवा अन्य भागात दादर ज्वारीच्या कडब्याची आवक होत नाही. खरेदीदार थेट शिवार किंवा गावातून कडब्याची खरेदी करीत आहेत. कडबा खरेदी करून त्याची कुट्टी केली जात आहे. लागलीच ही कुट्टी वाहतूक करून तिचा साठा केला जात आहे. खानदेशात धुळ्यातील दुधाळ पशुपालक जळगाव, चोपडा व अन्य भागातून चाऱ्याची खरेदी करीत आहेत. रावेर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागातील दुधाळ पशुपालक व अन्य शेतकरी जळगाव, चोपडा, शिरपूर भागातून दादरच्या कडब्याची खरेदी करू लागले आहेत, अशी माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.