Election Results: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनेलने जोरदार मुसंडी मारली आहे. सोमवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर झालेल्या सातही जागांवर पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला.