Solar Subsidy: ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत बसवलेल्या सौर संचाचे स्ट्रक्चर कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, संबंधित कंपनी दुरुस्तीसाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार भिलखेड येथील शेतकरी निळकंठ वामनराव लिप्ते यांनी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे..याबाबत सविस्तर वृत्त असे की, निळकंठ लिप्ते यांनी जानेवारी २०२६ मध्ये आपल्या शेतात एका कंपनीचा सौर पंप बसवून घेतला होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच म्हणजेच ३० मार्च रोजी रात्री या सौर पॅनेलचे लोखंडी स्ट्रक्चर पूर्णपणे कोलमडून पडले असल्याचे दिसून आले. स्ट्रक्चर उभे करताना खांबांची खोली कमी ठेवल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकर्याने केला आहे..Solar Pump Scheme: ...तर सौर कृषी पंप ७ दिवसांच्या आत बदलून देणे बंधनकारक, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विधानसभेत माहिती.कंपनीची उडवाउडवीची उत्तरेस्ट्रक्चर कोसळल्यामुळे पंप बंद पडला असून, सध्या कांदा पिकाला पाणी देणे आवश्यक आहे. पाणी न मिळाल्यास पीक वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात शेतकर्याने कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधला असता, "हे आमचे काम नाही, दुसऱ्या कंत्राटदाराला दोन-तीन हजार रुपये देऊन तुम्ही काम करून घ्या," असे उडवाउडवीचे उत्तर कंपनीकडून देण्यात आले, असे शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे..Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प.दुरुस्तीचा नियम धाब्यावरशासकीय नियमानुसार, सौर संचात बिघाड झाल्यास तो सात दिवसांच्या आत दुरुस्त करून देणे कंपनीला बंधनकारक आहे. नुकत्याच झालेल्या विधी मंडळाच्या अधिवेशनात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सात दिवसाच्या आत बदलून देणे, दुरुस्ती करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केलेले आहे. .मात्र, कंपनी तक्रार नोंदवून घेण्यासही तयार नसल्याने लिप्ते यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सौर पंप कार्यान्वित करून द्यावा, अशी मागणी निळकंठ लिप्ते यांनी अर्जाद्वारे केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.