Sangli News: मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत आटपाडी तालुक्यातील पाच गावांमध्ये उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहेत . प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहेत. माडगुळे (५ मेगावॉट) लिंगिवरे (१० मेगावॉट), पळसखेल (९ मेगावॉट) आणि करगणी (१० मेगावॉट) अशा एकूण चार प्रकल्पांमधून ३४ मेगावॉट क्षमतेची सौर वीज तयार होत आहे. दुष्काळी भागात सिंचनासाठी वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..माडगूळे प्रकल्पाची वीज माडगुळे व आटपाडी सबस्टेशनला, पळसखेल प्रकल्पाची वीज दिघंची व पुजारवाडी सबस्टेशनला, लिंगीवरे प्रकल्पाची वीज राजेवाडी सबस्टेशनला तर करगणी प्रकल्पाची वीज करगणी सबस्टेशनला जोडली आहे. करगणी सबस्टेशन वगळता तिन्ही ठिकाणी शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू आहे..CM Solar Scheme: राज्यात १०७१ मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारणार : फडणवीस.अपुरा व अनियमित वीजपुरवठा, भारनियमन, विद्युत पंप जळणे आदी कारणांमुळे शेतकरी त्रस्त होता. विशेषतः टेंभू योजनेचे पाणी आल्याने सिंचनासाठी विजेची मागणी वाढली होती. रात्रीच्या वेळेस कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांचे हाल होत होते; अपघातांचाही धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिवसा वीज पुरवठा धोरण राबवले असून सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. आटपाडी, माडगूळे, बोंबेवाडी, कौठुळी, देशमुखवाडी, पुजारवाडी, दिघंची, उंबरगाव, पळसखेल, राजेवाडी, लिंगीवरे, निंबवडे, आवळाई, मापटेमळा, भिंगेवाडी आदी गावांना याचा लाभ झाला आहे..Agriculture Solar Scheme : अकोला जिल्ह्यात १६ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज.हिवतड सबस्टेशनचेकाम अर्धवटकरगणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र शेटफळे–हिवतड सबस्टेशनचे काम अपूर्ण असल्यामुळे करगणी प्रकल्पातून वीज पुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. करगणीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर उभारलेला १० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प तयार असून त्याची वीज करगणी सबस्टेशनपर्यंत नेण्यात आली आहे. परंतु उच्च क्षमतेच्या भारामुळे जोडणी करण्यात आलेली नाही. शेटफळे आणि हिवतड सबस्टेशनची कामे अंतिम टप्प्यात असून पंधरा दिवसांत प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. त्यानंतर शेटफळे, करगणी, गोमेवाडी आणि हिवतड परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे..चारही सौर प्रकल्पांची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. त्यापैकी तीन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. शेटफळे आणि हिवतड सबस्टेशनचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करून करगणी सौर प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे.– आर. बी. डावरे, उपकार्यकारी अभियंता, आटपाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.