Solapur News: वाशिंबे येथील गायरान गट क्रमांक १४३ मध्ये प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पामुळे धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उजनी जलाशयातून धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अंदाजे ६० पाइपलाइन या परिसरातून जात असून, सौर प्रकल्पामुळे या पाइपलाइन काढाव्या लागणार आहेत. .पाइपलाइनच्या माध्यमातून वाशिंबे व राजुरी गावातील धरणग्रस्त शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली आहे. पाइपलाइन हटविल्यास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे..Farmers Protest: नुकसानीच्या अनुदान यादीत घोळ; शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन.ग्रामदैवताच्या रस्त्यावर कायमस्वरूपी अडथळा सौरऊर्जा प्रकल्पामुळे वाशिंबेचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता कायमस्वरूपी बंद होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. वाशिंबे येथील वेलची केळीला आखाती देशांमध्ये तसेच मोठ्या रिटेल मॉलमध्ये मोठी मागणी आहे..Karnataka Farmer Protest: कर्नाटकतील शेतकऱ्यांचे रस्त्यावर तूर ओतून आंदोलन.सौर प्रकल्पामुळे या फळबागांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन बंद होणार आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार वाशिंबे गावात ३,१४४ इतकी पशुधन संख्या आहे. सौर प्रकल्पामुळे चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन पशुपालकांवर संकट ओढवणार आहे..धरण आणि रेल्वे दोन्हीसाठी जमिनी गेल्या तरी आम्ही पुन्हा उभे राहिलो. पण आता सौर ऊर्जा प्रकल्पाचे नावाखाली धरणग्रस्तांवर वर पुन्हा वनवास लागला जात आहे. एकदा सर्व दिले, आता आमचेच अस्तित्व तरी शिल्लक ठेवा. सौरऊर्जा प्रकल्प तत्काळ रद्द करा.कल्याण मगर, प्रगतशील शेतकरी वाशिंबे, ता. करमाळा.प्रकल्पामुळे ग्रामदैवत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानकडे जाणारा रस्ता जर बंद होत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे. स्थानिक पशुपालन आणि शेतीवर या प्रकल्पामुळे परिणाम होणार आहे. शेतकरी ग्रामस्थांना, एकत्रित करून आंदोलन करून हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडू. नानासाहेब झोळ, अध्यक्ष भैरवनाथ मंदिर समिती, वाशिंबे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.