Solapur Agriculture News: वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत असताना सोलर फेन्सिंग(सौरऊर्जेवर आधारित तारेचे झटका कुंपण) साठी दिले जाणारे अनुदान अपुरे ठरत आहे. राज्य सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय योजनेतून सौरऊर्जेवर आधारित झटका कुंपणासाठी एकरी १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र सौरऊर्जा संचाच्या किमती, तारांचे दर यासाठी प्रत्यक्ष ४० हजारांहून अधिक खर्च येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच उत्तर सोलापूर तालुक्यातील आठ प्रस्ताव अनेक महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत..जिल्ह्यात रानडुकरांसह अन्य वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस होत आहे. काही ठिकाणी रानडुकरांच्या हल्ल्यांच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेवर आधारित झटका कुंपण हा प्रभावी उपाय मानला जातो. .Solar Fencing Subsidy: सौर कुंपणासाठी १००% अनुदान: वनमंत्री नाईक यांची मोठी घोषणा!.मात्र सौरऊर्जा संच, उच्च दर्जाच्या तारा आणि इतर साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासनाकडून मिळणारे १५ हजार रुपयांचे अनुदान प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत अपुरे ठरत असल्याचे शेतकरी सांगतात..Biological Fencing : जंगलालगतच्या शेतीचे जैविक कुंपण करणार संरक्षण.शेतकऱ्यांना मंजुरीची प्रतीक्षाउत्तर सोलापूर तालुक्यातील सोलर फेन्सिंगचे आठ प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवले आहेत. अनेक महिने झाले तरीही प्रस्तावांना मंजुरी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. रानडुकरांमुळे सतत पिकांच्या नुकसानीला वैतागलेले शेतकरी वारंवार वनविभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत..तार कुंपण योजनाराज्य सरकारकडून तार कुंपण योजनाही राबविली जाते. या योजनेतून तार व लोखंडी खांबासाठी अनुदान मिळते. यामुळे पिकांचे संरक्षण, उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत होते. तार कुंपणसाठी एक ते दोन हेक्टरसाठी ९० टक्के, दोन ते तीन हेक्टरसाठी ६० टक्के, तीन ते पाच हेक्टरसाठी ५० टक्के व पाच हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी ४० टक्के अनुदान दिले जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.