Dharashiva News: भारनियमनामुळे पिकांच्या सिंचनासाठी रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. हिंस्र पशू, साप-विंचू आदींचा धोका पत्करावा लागतो. याशिवाय वीजपंपातील घोटाळा, फ्यूज बदलणे आदीवेळी विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचे मृत्यू होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात. वीजबिलेही भरमसाट येतात. ते भरणे शक्य होत नाही. त्यामुळे बिले थकत जातात; मात्र आता ही परिस्थिती बदलू लागली आहे. या संकटांतून सुटका करून घेण्यासाठी शेतकरी राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला भरभरून प्रतिसाद देऊ लागले आहेत. सौर कृषिपंपांची उभारणी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. .राज्य शासनाकडून मागेल त्याला सौर कृषिपंप योजना महावितरणच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. योजनेतून शेतात सौर कृषिपंप बसविण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल ६८ हजार ४७ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी २२ हजार ६१८ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याचे पैसे ऑनलाइन जमा केले आहेत. तसेच १७ हजार ५३७ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप बसविण्यासाठी संबंधित कंपन्यांची निवड केली आहे. आतापर्यंत एकूण ७ हजार १७६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप उभारले गेले आहेत..Solar Pump Scheme: अठरा हजारांवर शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाची प्रतीक्षा.शेतकऱ्यांना संकटांतून बाहेर काढण्यासाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजना मोलाची ठरत आहे. दिवसा वीजपुरवठ्याची शाश्वत सोय होत असल्याने पिकांचे उत्पादन वाढविणे देखील सोयीचे झाले आहे. हे पंप वीजजाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतात..Solar Pump Scheme : सौर कृषिपंप योजनेत कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक.लाभार्थी निवडीचे निकषअडीच एकरांपर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषिपंप, २.५१ ते ५ एकरांपर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरांवरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप देय राहील. वैयक्तिक, सामूहिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक, बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतीधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहीर व नदी आदी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. अटल सौर कृषिपंप योजना-१, अटल सौर कृषिपंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील..पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत होते. वीजपुरवठा खंडित झाला की काम अडून राहायचे. वीजबिलाचा प्रश्न होताच. त्यात वीजपंप जळाला की तो भरून आणण्यासाठी दोन-तीन हजार रुपये खर्च यायचा. या सर्व त्रासातून सुटका करून घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वी विहिरीवर सौर कृषिपंप बसविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे.- भाऊसाहेब धंगेकर, अंबेजवळगे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.