Ahilyanagar News : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौरपंप बसवणीच्या कामात गैरप्रकार होत असल्याचे उघड होत आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वस्त, शाश्वत व अखंड ऊर्जा उपलब्ध करून देणे हा होता. परंतु प्रत्यक्षात ठेकेदार कंपन्यांची मनमानी, अधिकाऱ्यांचा उदासीनपणा आणि अर्धवट कामामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ठेकेदार अधिक पैसे मागत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत..शासनाकडून मागेल त्याला सौर कृषीपंप योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येतात. एकूण खर्चापैकी साधारण जातीतील शेतकऱ्यांना फक्त १० टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना फक्त ५ टक्के वाटा भरावा लागतो. .Agriculture Solar Pump : पैसे भरूनही सौरपंप मिळेना.उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून भागवली जाते. मात्र पाथर्डी तालुक्यात या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. सौरपंप बसविताना लागणारे सिमेंट काँक्रिट बेस, खड्डे खणणे, कारागीर मजुरी, वाहतूक व तांत्रिक देखरेख यांचा संपूर्ण खर्च ठेकेदार कंपनीकडून केला जाणे अपेक्षित आहे. .शासनाने मंजूर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी केवळ त्यांचा ठरावीक वाटा भरायचा आहे. परंतु वास्तवात ठेकेदारांकडून हेच सर्व खर्च थेट शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहेत. अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. सिमेंट व इतर साहित्य शेतकऱ्यांकडून खरेदी करायला भाग पाडले जाते. .Solar Pump: सौर कृषी पंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.मंजूर प्लेटा न बसवता कमी प्लेट बसवूनही सोलर पंप सुरू दाखवला जातो. या प्रकारांमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अतिरिक्त बोजा बसत आहे. अधिकाऱ्यांकडून यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असूनही प्रत्यक्षात ठेकेदारांवर कोणतेही बंधन नाही. अनेक ठिकाणी अधिकृत तपासणी न करता थेट इन्स्टॉलेशन दाखवले जाते आणि कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे नोंदवले जाते. शासन अनुदान देऊनही शेतकऱ्यांची अशी लूट होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे..सौरकृषीपंप कंपनीचे मंजूर साहित्य बसवणारे शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल करून सरळसरळ लूट करत आहेत. सिमेंट, खड्डे खोदणे, मजुरी व वाहतूक यांचा खर्च ठेकेदाराकडे असूनही तो आमच्याकडून घेतला जातो. मंजूर प्लेटा न बसवता अर्धवट काम करून ते पूर्ण दाखवले जाते.त्या बाबतची लेखी तक्रार सहाय्यक अभियंता पाथर्डी यांकडे केली आहे.जर प्रशासनाने यावर तातडीने कारवाई केली नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.- अर्जुन ग्यानबा गाडे, शेतकरी, कोरडगाव ता. पाथर्डी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.