Solapur News : सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात भूसंपादन अधिकाऱ्यानेच १४० कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम वाढविली, यातील काही रक्कम वाटप झाली असल्याचा अहवाल अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिला आहे. .हाच अहवाल पुढे राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकारांना दिली. या मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातून संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन वाढल्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश शासनाने दिले होते. त्यानूसार जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारीमध्ये ही समिती स्थापन केली होती..Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर.या समितीमध्ये भूसंपादन क्र. ७ च्या उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, उत्तर सोलापूर तालुक्याचे भूमिअभिलेखचे उपअधीक्षक, सहाय्यक नगर रचना कार्यालयाचे सहाय्यक नगर रचना अधिकारी यांचा समावेश आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन क्र. १ चे अधिकारी अमोलसिंह भोसले काम पाहिले..या समितीने वारंवार बैठका घेऊन जिल्ह्यातील खेड, मार्डी, बाळे, बाणेगाव, भोगाव, देगाव, होनसळ, कसबे सोलापूर, सोलापूर शहरातील मुरारजी पेठ, सेवालालनगर या गावातील निवाड्यांची पडताळणी केली. भूसंपादनात वाटप केलेली अतिरिक्त रक्कम ही याच भागातील जमिनीची आहे..Land Acquisition: शेतीला एकरी 50 लाखाचा मोबदला द्या; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध.जमिनींचे वाढीव मूल्यांकन दाखवून ही रक्कम वाटली आहे. या शिवाय लोहमार्गात बाधित झालेल्या इमारती, झाडे या मूल्यांकनात देखील वाढीव रक्कम वाटप केली गेली असल्याची दाट शक्यता आहे. बाधितांना वाटप केलेली अतिरिक्त रक्कम शासन कशी वसूल करणार?, तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांसह संबंधितांवर शासन काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..आकडे बोलतात...सोलापूर ते धाराशिव लोहमार्गात लांबी - २४ किमीएकूण बाधित गट संख्या - २६०एकूण बाधित - ५ हजार ८५भरपाईची एकूण रक्कम - ५८६ कोटी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.