Water Scarcity : सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा संपताच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने सोलापूर जिल्ह्यातील १०८ गावे आणि ५५१ वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मोहोळ आणि पंढरपूर हे दोन तालुके वगळता उर्वरित ९ तालुक्यांमध्ये आतापासून टंचाईची दाहकता जाणवू लागली आहे..जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांना बसला असून, येथे टँकरची संख्या अधिक आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात ९७ टँकर सुरू होते, त्यात वाढ होऊन आता हा आकडा ९८ टँकरवर पोहोचला आहे, हे सर्व टँकर खासगी ठेकेदारांमार्फत चालवले जात आहेत. .Maharashtra Drought: दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा : कृषिभूषण विजयअण्णा बोराडे .पूर्वी टँकरच्या दिवसाला १५३ फेऱ्या होत होत्या, ज्या आता वाढवून १६८ फेऱ्या करण्यात आल्या आहेत. नागरिकांसह जनावरांनाही पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलत ३६ विहिरी आणि २१ बोअरवेल्सचे अधिग्रहण केले आहे..Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार.तालुकानिहाय टँकरची गावेमंगळवेढा: २३ गावेसांगोला: २० गावेमाढा: १४ गावेबार्शी: १३ गावेअक्कलकोट ः११ गावेकरमाळा: ११ गावेमाळशिरस: ८ गावेउत्तर सोलापूर: ५ गावेदक्षिण सोलापूर: ३ गावे.नागरिकांना पाणीटंचाईची झळ अजिबात बसू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मागणीनुसार पाण्याच्या टँकरची तातडीने सोय केली जात असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पूर्णपणे सज्ज आहे.- प्रसाद काटकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.