Medicine Purchase Approval: सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत १५ आयत्या वेळेच्या विषयांसह २७ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आषाढी वारीसाठी १ कोटी रुपयांची औषध खरेदी, १० ठिकाणी नवीन पशुवैद्यकीय दवाखाने बांधण्यासाठी जागा निश्चिती, जीर्ण इमारतींचे पाडकाम व १५ व्या वित्त आयोगाच्या ८५ कोटींच्या निधीचा आराखडा तयार करण्यास सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली..जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सभापती रामप्पा चिवडशेट्टी, चेतनसिंह केदार, संस्कृती सातपुते, अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आदी उपस्थित होते..Veterinary Hospitals: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती .सभेसमोर एकूण २७ विषय होते. यापैकी १५ विषय आयत्या वेळेचे होते. सर्वच विषयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. यामध्ये २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधी योजनेचे ४७ लाख ७६ हजार, तर दिव्यांग कल्याण योजनेचे ५१ लाख ३५ हजार रुपये अखर्चित राहिल्याने दोन्ही योजनांना मुदतवाढ देण्यात आली. मागासवर्गीय लाभार्थ्यांना शेळीगट, तर दिव्यांग लाभार्थ्यांना ई-बाईक योजनेस मुदतवाढ देण्यास सभागृहाने मंजुरी दिली. धोकादायक झालेल्या माढा तालुक्यातील बेंबळे येथील ग्रामपंचायत कार्यालय, पिंपळखुटे येथील जुने वाचनालय, अक्कलकोट तालुक्यातील चपळगाववाडी ग्रामपंचायत इमारत व दर्शनाळ येथील उर्दू शाळा आणि समाजमंदिर यांच्या पाडकामास सभागृहाने मंजुरी दिली..Veterinary Colleges Approval: राज्यात चार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता.अंगणवाड्यांना विविध साहित्य पुरवण्यासाठी १ कोटींच्या खर्चास, तसेच ८४ अंगणवाडी बांधकामे व १०५ अंगणवाडी दुरुस्ती कामे, हातपंप दुरुस्तीसाठी सुटे साहित्य खरेदीस मंजुरी देण्यात आली..१५ व्या वित्त आयोग निधीवरून सदस्यांमध्ये मतभेदसदस्य अतुल पवार यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाचे अधिकार जिल्हा परिषद सदस्यांना असावेत, अशी मागणी केली. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये विरोधी पक्षाची सत्ता असते. त्यामुळे ग्रामपंचायतींऐवजी सदस्यांना अधिकार द्यावेत, अशी त्यांची मागणी होती. यावर सचिन जाधव यांनी मतदारसंघातील सर्व गावांनी मतदान केले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांची गावे असा भेद न करता सर्व गावांना समान निधी द्यावा, अशी मागणी केली. यावर सदस्य अण्णा ढोणे व चरण चवरे यांनी अध्यक्षांनी सर्व सदस्यांना विकासकामांसाठी समान निधी देण्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.