Solapur News : सोलापूरच्या पर्यटन वैभवाला राज्यस्तरावर नवी ओळख देण्यासाठी ड्रीम फाउंडेशन आणि सोलापूर पर्यटन विकास मंच यांच्या वतीने ‘सोलापूर पर्यटन जागर संमेलन’ आणि ‘पर्यटन जागर पंधरवडा’ १४ ते २८ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ड्रीम फाउंडेशनचे प्रमुख काशिनाथ भतगुणकी यांनी दिली..या पंधरवड्यात पर्यटन क्षेत्रासोबतच कृषी पर्यटनालाही प्रोत्साहन देण्याचा उद्देश असून, यामध्ये एकदिवसीय पर्यटन कार्यशाळा – संगमेश्वर देवस्थान, हत्तरसंग कुडल येथे होईल. बसव संगम शेतकरी गट, अस्सल सोलापुरी पाहुणचार आणि ड्रीम टुर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. .Agro Tourism Pune : शेती इकली नाय, तर राखली....पर्यटन जागर अभियानाची सुरुवात पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा येथून करण्यात येणार असून, राज्यभरातून लोकांना सोलापुराशी जोडण्याचा प्रयत्न यामागे आहे. या उपक्रमांद्वारे सोलापूरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळांची राज्यभर ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले..Pune Forest Tourism: पुणे जिल्ह्यातील वनपर्यटनात क्षमता मोठ्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.सरपंचांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रग्रामपंचायत सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी जामगुंडे फार्म हाउस येथे विशेष मार्गदर्शन सत्र या विशेष सत्रात पोपटराव पवार व कवी इंद्रजित भालेराव मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, राज्यातील ३६ जिल्ह्यांतील प्रशिक्षकांसाठीही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, असे भतगुणकी यांनी सांगितले.....या पंधरवड्यातील प्रमुख उपक्रमसोलापूर पर्यटन जागर यात्राकृषी पर्यटन केंद्र संचालक मेळावासोलापूर भूमिपुत्र अधिकारी व उद्योजकांसाठी सोलापूर दर्शन व कुटुंबीयांसह मेळावाराज्यस्तरीय कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अधिवेशनराज्यातील सामाजिक व स्वयंसेवी संस्थांसाठी पर्यटन विशेष सत्र.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.