Travel Update: राष्ट्रीय महामार्ग विभागाने तयार केलेल्या मार्गावरील टोलच्या दरात बुधवारपासून (ता. १) दरवाढ करण्यात आली आहे. यामध्ये ३ ते ५ टक्के वाढ करण्यात आली असून याची अंमलबजावणी मंगळवारी रात्री १२ नंतर सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक स्वप्निल कासार यांनी दिली..जिल्ह्यातील सातही टोलनाक्यावर दरवाढ लागू करण्यात येणार आहे. या दरवाढीमुळे बस व मालवाहतुकीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने यंदाही टोलच्या दरात वाढ केली आहे. जे नियमित दर आहेत, त्यामध्ये आता पाच रुपयांची वाढ होणार आहे. स्थानिक वाहनांसाठी जे मासिक पासेस दिले जातात,.Toll Road India : ‘टोल’धाडीचे राजकीय अर्थशास्त्र.त्यात १० रुपये तर वार्षिक पासच्या दरात ७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मासिक पास पूर्वी ३४० रुपये होते, ते आता ३५० रुपये असतील तर वार्षिक पास ३ हजार रुपये होते, त्यात ७५ रुपयांची भर पडली आहे. टोलनाक्यावर ही दरवाढ रात्री १२ नंतर लागू होणार आहे..Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही.दोन टोलमध्ये ६० किमी अंतरराष्ट्रीय महामार्ग विभाग महागाईच्या वाढीवरून टोलच्या दरात वाढ करते. तीन वर्षे १ एप्रिलपासूनच टोल दरात वाढ केली होती. सरासरी ३ ते ५ टक्के इतकी दरवाढ करण्यात येते. ऑक्टोबर २०२५ मध्ये दरात कपातही करण्यात आली होती. .दोन टोलमध्ये ६० ते ८० किमी अंतर असून त्या मार्गावरील असलेले पूल व अंतरावर टोलची आकारणी केली जात असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.