Gokul Sugar Solapur: ‘गोकुळ शुगर’ कारखान्याकडील थकीत ऊसबिलासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन गुरुवारी (ता. २८) चौथ्या दिवशीही कायम राहिले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीकडे कारखाना प्रशासनाने पाठ फिरवल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला..अक्कलकोट तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी गोकुळ शुगर कारखान्याकडील सुमारे १३० कोटी रुपयांच्या थकीत रकमेसाठी सोमवारपासून (ता. २५) जिल्हा परिषद येथील पूनम गेटसमोर उपोषण आंदोलन करीत आहेत. बुधवारी (ता. २७) दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. ‘‘कारखान्यावर आरआरसी (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल,’’ असे आश्वासन देत त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती शेतकऱ्यांना केली होती..Sugarcane Farmers Protest: ऊस उत्पादकांच्या ‘एफआरपी’ थकबाकीवरून आंदोलनाचा इशारा.मात्र ‘‘उसाच्या घामाचा पै-पै मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,’’ अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात महिलांसह सुमारे २०० शेतकरी सहभागी झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे..Sugarcane Farmers Protest: ओंकार साखर कारखान्यासमोर थकीत ऊस बिलासाठी आंदोलन.प्रशासनाची आरआरसी कारवाई अत्यंत वेळखाऊ आहे. गेल्या सात महिन्यांपासून आम्ही आमच्या घामाच्या पैशांची वाट पाहत आहोत. आता उसाचे पैसे हातात मिळाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही.- नागनाथ बोंगरंगे, शेतकरी, खुदावाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव.गोकुळ शुगरच्या थकीत ऊसबिलासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक होते. मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. मदतीसाठी संपर्क करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही.- श्रीशैल स्वामी, शेतकरी, काझीकनबस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.